"चंदू डेगवेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
चंदू डेग्वेकर (पूर्ण नाव - चंद्रकांत हरी डेगवेकर, जन्म : [[श्रीवर्धन]], १६ जानेवारी, इ.स. १९३४) हे एक मराठी नाट्यअभिनेते आहेत. ते उत्तम गायक आहेत. संगीत नाटकांमध्ये विनोदी भूमिका करणे ही त्यांची खासियत आहे.
डेग्वेकर यांचे मूळ घराणे [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यातील]] [[श्रीवर्धन]] येथील. डेग्वेकर यांचा जन्मही तेथेच झाला.. इंग्रजी तिसरीपर्यंतचे त्यांचे शिक्षण श्रीवर्धन येथेच झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले. [[गिरगाव]] येथील विल्सन हायस्कूल येथे त्यांचे पुढील शिक्षण झाले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ‘मॅट्रिक’ झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी छोटी-मोठी कामे केली. पुढे ‘सीटीओ’ (पोस्ट अॅण्ड टेलिग्राफ)मध्ये त्यांना ‘फोनोग्राम ऑपरेटर’ म्हणून नोकरी लागली. ही नोकरी करत असतानाच के.सी. महाविद्यालयातून त्यांनी ‘इंटर’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. हरी डेग्वेकर हे त्यांचे वडील. त्यांना भजनाचे वेड होते. त्यामुळे घरात लहानपणापासूनच गाणी, भजने त्यांच्या कानावर पडत गेली आणि तोच संस्कार त्यांच्यावर झाला. लहानपणी वडिलांनी त्यांना छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमांतून अभंग म्हणण्यासाठी पाठविले. त्यामुळे स्टेजवर उभे राहण्याची, वावरण्याची त्यांची भीती लहानपणीच गेली. गणेशोत्सवात वेगवेगळ्या नाटकांतून त्यांनी कामेही केली. गिरगावातील गायवाडी येथील बंडोपंत रानडे यांच्याकडे ते काही काळ गाणेही शिकले. त्या वेळी काही संगीत नाटकांतूनही त्यांनी
==सुरुवात==
ओळ १२:
चंदू डेग्वेकर हे [[मा. दत्ताराम]]ांना आदर्श आणि [[भालचंद्र पेंढारकर|अण्णा पेंढारकरांना]] आपले गुरू मानत.
डेग्वेकर यांनी आत्तापर्यंत सुमारे ५० संगीत, सामाजिक, ऐतिहासिक नाटके तसेच फार्सांमधून विविध भूमिका साकार केल्या आहेत. ‘शारदा’ (कांचनभट), ‘सौभद्र’ (बलराम), ‘मृच्छकटिक’ (शकार), ‘मानापमान’ (धैर्यधर), ‘मत्स्यगंधा’ (भीष्म), ‘स्वयंवर’ (शिशुपाल), ‘संशयकल्लोळ’ (फाल्गुनराव),‘भावबंधन’ (प्रभाकर व कामण्णा), ‘एकच प्याला’ (भगीरथ, शरद), ‘पंडितराज जगन्नाथ’ (कलंदर), ‘मंदारमाला’ (भैरव), ‘सुवर्णतुला’ (नारद), ‘जय जय गौरी शंकर’ (शृंगी), ‘स्वरसम्राज्ञी’ (भय्यासाहेब), ‘बावनखणी’ (मोरशास्त्री) ही डेग्वेकर यांची गाजलेली संगीत नाटके. ‘दुरितांचे तिमीर जावो’मधील त्यांनी साकारलेला ‘बापू’ही गाजला. ‘बेबंदशाही’, ‘ययाती आणि देवयानी’, ‘उद्याचा संसार’, ‘लग्नाची बेडी’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘देव दिनाघरी धावला’, ‘अपराध मीच केला’, ‘साष्टांग नमस्कार’ आदी ऐतिहासिक, सामाजिक नाटकांतून तसेच ‘गीत सौभद्र’, ‘महाश्वेता’ आदी संगीतिकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या.
==चंदू डेग्वेकर यांची नाटके आणि (त्यातील भूमिका)==
* अपराध मीच केला
* उद्याचा संसार (शेखर)
* एकच प्याला (भगीरथ, शरद)
* एखाद्याचे नशीब
* करीन ती पूर्व (बाजीप्रभू-खाशाबा)
Line २० ⟶ २४:
* संगीत जय जय गौरी शंकर (शृंगी)
* दुरितांचे तिमिर जावो (बापू)
* संगीत
* संगीत पंडितराज जगन्नाथ (कलंदर खाँ)
* प्रेमा तुझा रंग कसा (प्रो.बल्लाळ)
Line ३२ ⟶ ३६:
* मुंबईची माणसं
* संगीत मृच्छकटिक (शकार आणि मैत्रेय)
* ययाती आणि देवयानी
* रक्त नको मज प्रेम हवे (नायक-)
* वरात
* [[वल्लभपूरची दंतकथा]]
* संगीत शारदा (कांचनभट)
* संगीत संशयकल्लोळ (फाल्गुनराव)
* साष्टांग नमस्कार
* संगीत सुवर्णतुला (नारद)
* संगीत सौभद्र (बलराम, वक्रतुंड)
* संगीत स्वरसम्राज्ञी (भय्यासाहेब)
==चंदू डेग्वेकर यांची भूमिका असलेल्या संगीतिका==
* गीत सौभद्र
* ‘महाश्वेता
==पुरस्कार==
* गायनाचार्य [[रामकृष्णबुवा वझे]] पुरस्कार
* रंगशारदा संस्थेचा [[विद्याधर गोखले]] पुरस्कार
* नाटय़ परिषद-पुणे यांचा [[केशवराव दाते]] पुरस्कार
* [[गोविंद बल्लाळ देवल]] पुरस्कार
* [[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद]]ेचा जीवनगौरव पुरस्कार (१४-६-२०१६)
* [[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद]]ेचा चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार (२०१३)
* महाराष्ट्र सरकारचा [[अण्णासाहेब किर्लॊस्कर]] जीवनगौरव पुरस्कार (२०१६)
|