"धूळपाटी/भारतीय नाट्य-चित्रपटांतील अल्पायुषी अभिनेते" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →अल्पायुषी |
|||
ओळ ३४:
* [[स्मिता पाटील]] : मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री. वयाच्या ३१व्या वर्षी (१३ डिसेंबर १९८६ रोजी) बाळंतपणात निधन.
* सौंदर्या : दक्षिणी भारतीय नटी. २००४मध्ये एका विमान अपघातात सौंदर्याचा मृत्यू झाला. उड्डाण होताच काही मिनिटातच विमानाला आग लागली आणि त्यानंतर खाली कोसळले. यात ३१ वर्षीय सौंदर्याचा मृत्यू झाला.
==रंगमंचावर मरण आलेलॆ अन्य कलावंत==
* [[वि. वा. शिरवाडकर]] लिखित आणि ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ची निर्मिती असलेल्या ‘नटसम्राट’ नाटकाचा पहिला प्रयोग २३ डिसेंबर १९७० या दिवशी मुंबईत बिर्ला मातोश्री सभागृहात सादर झाला. नाटकात ‘विठोबा’ ही भूमिका करणारे कलावंत बाबूराव सावंत यांनाही नाटकाचा प्रयोग सुरू असताना मरण आले होते. ‘नटसम्राट’च्या तिसऱ्या अंकातील शेवटच्या प्रवेशाच्या वेळी सावंत यांच्या संवादानंतर डॉ. [[श्रीराम लागू]] यांचे नाटकातील शेवटचे स्वगत सुरू होते आणि त्या स्वगतावर नाटकाचा शेवट होऊन पडदा पडतो. त्या वेळी नाटकाचा पडदा पडता पडता इकडे आतमध्ये सावंत खाली कोसळले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा रंगमंचावरच मृत्यू झाला.
नाटककार व अभिनेते नागेश जोशी, [[शंकर घाणेकर]], [[राजा गोसावी]], शाहीर [[विठ्ठल उमप]] आदी कलाकारांनाही अशाच प्रकारे मृत्यूने गाठले होते. ‘देवमाणूस’ नाटकाचे लेखक व नाटकातील प्रमुख भूमिकेत असलेले नागेश जोशी यांना एका प्रयोगाच्या वेळी असे मरण आले, तर अभिनेते [[शंकर घाणेकर]] यांनीही कोकणातील एका प्रयोगाच्या वेळी अखेरचा श्वास घेतला. ‘भ्रमाचा भोपळा’ या नाटकाचा प्रयोग मुंबईत दीनानाथ नाटय़गृहात होता. राजा गोसावी रंगभूषा करून तयार होते. प्रयोग सुरू होण्यापूर्वी रंगपटातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण त्यांचा मृत्यू झाला होता.
शाहीर[[विठ्ठल उमप]] यांचे नागपूर येथे हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने व्यासपीठावर ते कार्यक्रम सादर करत असतानाच अचानक खाली कोसळले आणि त्यांचे निधन झाले.
|