"अच्युत बळवंत कोल्हटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६:
==‘संदेश’ची स्थापना==
अच्युत बळवंत कोल्हटकरांनी १९१५ साली काढलेल्या संदेश ह्या पत्राने मराठी वृत्तपत्रसृष्टीचा गंभीर चेहरामोहराच बदलून टाकला. भावनेला आवाहन करणारे, तसेच कल्पकतेने आणि विनोदाने प्रतिपक्षाची भंबेरी उडवून टाकणारे अग्रलेख, ‘संदेशचा अहेर’, ‘बेटा गुलाबच्या कानगोष्टी’, ‘चहा, चिवडा, चिरूट’, ‘संदेश दरबारचा पदवीदान समारंभ’ इ. चटकदार सदरे, चित्तवेधक, बातम्या, आकर्षक मथळे ह्यांमुळे मराठी वृत्तपत्रीय लेखनात बहुरंगीपणा आला व ते जनसामान्यांपर्यंत पोहोचले. त्यांनी चालू केलेल्या मेसेज (१९१७) ह्या इंग्रजी वृत्तपत्राचा मात्र जम बसला नाही. संदेश लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच सरकारी अवकृपेस बळी पडले आणि बंद झाले
.
 
==अन्य व्रूत्तपत्रे आणि मासिके==
‘संदेश’ बंद पडल्यावर कोल्हटकरांनी संजय, चाबूक, चाबूकस्वार ह्यांसारखी अनेक पत्रे काढली. पटवर्धन व तुळजापूरकर ह्यांच्या साहाय्याने त्यांनी श्रुतिबोध (१९१२) आणि उषा (१९१३) ही मासिके चालविली. ‘सौ. वत्सलावहिनी यांचे प्रसिद्ध व अप्रसिद्ध लेख’ (१९१५), ‘चोरी कशी करावी? ’(१९२५), ‘अच्युतराव कोल्हटकर स्मारक ग्रंथ’ आदी पुस्तकांतून त्यांचे निवडक लिखाण संकलित झालेले आहे.
 
==कोल्हटकरांचे गाजलेले लेख==
लोकमान्य टिळकांवरील मृत्युलेख, ‘मराठी काव्याची प्रभात’, ‘शेवटची वेल सुकली’, ‘दोन तात्या’, ‘पुणेरी जोडे’, ‘माधवाश्रमात शिवाजी’ ह्यांसारखे त्यांचे वेचक लेख वृत्तपत्रीय मराठी साहित्याची भूषणे आहेत.
 
==नाटके आणि कादंबर्‍या==
अ.ब. कोल्हटकरांनी स्वामी विवेकानंद, नारिंगी निशाण (१९१७) व संगीत मस्तानी (१९२६) यांसारखी नाटकेही लिहिली. स्वतःची नाटक कंपनी काढून काही नाटकांतून भूमिका केल्या. काही कादंबर्‍या लिहिल्या, तथापि ‘संदेशकार’ हीच त्यांची जनमानसात विशेष रूढ झालेली प्रतिमा होती.
 
 
 
 
.
 
==चरित्र==