"वि.ग. कानिटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
विनायक गजानन कानिटकर (जन्म : २६ जानेवारी, इ.स. १९२६; [[मृत्यू|निधन]] : [[३० ऑगस्ट]], [[इ.स. २०१६|२०१६]]) हे एक मराठी विचारवंत [[लेखक]] होते. कानिटकर यांनी अनेक ऐतिहासिक पुस्तकांचे लेखन केले होते. जागतिक राजकारणाचा त्यांचा दांडगा व्यासंग होता. जगाच्या राजकारणात उलथापालथ घडवणार्‍या अनेक महापुरुषांची चरित्रे त्यांनी ओघवत्या शैलीत शब्दबद्ध केली होती.
 
बीए (ऑनर्स), बीएस्सी ही पदवी घेऊन कानिटकरांनी ३७ वर्षे सरकारी नोकरी केली. नोकरीदरम्यानच विविध नियतकालिकांतून लेखनास सुरवात केली. "मनातले चांदणे‘ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्यानंतर इतिहास, चरित्र, कथा, कादंबरी, अनुवाद अशा विविध वाङ्‌मय प्रकारातील त्यांची चाळीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. नोकरीमुळे पुण्यात स्थायिक झाल्यानंतर "माणूस‘मधून लिहिलेल्या त्यांच्या लेखमाला गाजल्या. शिवाय, इतिहास आणि आंतरराष्ट्रीय घटनांचा वेध घेणारी पुस्तके चर्चेचा आणि अभ्यासाचा विषय ठरली.
 
‘नाझी भस्मासुराचा उदयास्त‘ ही लेखमाला प्रथम "माणूस‘मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यांनी "रा. म. शास्त्री‘ या टोपण नावाने ती लिहिली होती. मात्र, कानिटकर यांचे नाव वाचकांना पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीनंतर कळले. या पुस्तकाच्या सव्वीसहून अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.
 
कानिटकर ‘ललित’ मासिकात ‘गप्पांगण’ या नावाचे एक रोचक सदर काही महिने लिहित होते. त्यांनी ‘स्वाक्षरी’ नावाचे आत्मचरित्रवजा पुस्तक लिहिले आहे.
Line १७ ⟶ २१:
* पूर्वज (ऐतिहासिक/राजकारण)
* फाळणी : युगान्तापूर्वीचा काळोख
* मनातील चांदणे (कथासंग्रह)
* महाभारताचा इतिहास
* माओ क्रांतीचे चित्र आणि चरित्र