"सनई चौघडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सनई-चौघडा ही मंदिरात किंवा मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेरच्या ओ...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
पारंपरिक भारतीय संस्कृतीत सनई या सुषिरवाद्याला (भोके असलेल्या नळीत फुंकर मारून वाजवल्या जाणार्‍या वाद्याला) खूप महत्त्व होते. पहाटेच्या मंगलमय शांत वातावरणात दिवसाची सुरुवात गावागावांतून मंदिरांमध्ये सनई या मंजुळ वाद्याने करण्याची प्रथा होती. गडांच्या आणि वाड्यांच्या प्रवेशद्वारी उभारलेल्या देवडीवर दिवसाचा प्रारंभ सनई-चौघड्याने होत असे. भविष्यात दिगंत कीर्ती लाभलेली अनेक सनईवादकांच्या यशाचा प्रारंभ मंदिराच्या प्रवेशद्वारी उभारलेल्या निनादणाऱ्या चौघडा-सनईवादनाने होत असे. महाराष्ट्राचे विख्यात सनईवादक [[शंकरराव गायकवाड]] हेही एक चौघडाचमूचे वादक होते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहनाईनवाझ [[बिस्मिल्लाखान]] हेही [[वाराणसी]]च्या [[काशी]]-विश्वेश्वराच्या मंदिरासमोर सनईवादन करीत असत.
 
या सनईला आडव्या ठेवलेल्या दोन चर्मवाद्यांची म्हणजेच चौघड्यांची तालसाथ दिली जाते. हे तालवाद्य टिपर्‍यासारख्या दोन काठ्यांनी वाजविले जाते. तबलावादनाला हाताचाच उपयोग होत असल्यामुळे, त्यावर नैसर्गिक नियंत्रण सुलभ असले, तरी चौघड्यातील तालवाद्यात दोन काठ्यांचा समन्वय साधणे हे कौशल्याचे काम असते. चौघडा पथकात साधारणतः एक सदस्य सूरपेटी धरून बसलेला असतो. काही पथकांमध्ये मुख्य सनईवादकाला साथ देण्यासाठी नवोदित शिकाऊ वादक सुरांत सूर मिसळत असतो. गायकाच्या मागे जसा तंबोरावादक रंग भरीत असतो, तसा हा शिष्य मुख्य सनईवादकाला श्वास घेण्यास उसंत देत मंजुळ सुरावट थोपवू देत नाही.
 
चौघडा आणि नौबत (नगारा) यांचा इतिहास थेट कौरव-पांडवांच्या युद्धापर्यंत जाऊन थडकतो. त्या काळात चौघडा आणि नौबत जेव्हा एकत्रित वाजत असत, तेव्हा त्याला 'दुंदुभी' म्हणत. सैनिकांना स्फुरण चढण्यासाठी युद्धाच्या प्रारंभी नौबत वाजवत, तर युद्धातील विजयानंतर दुंदुभी वाजवून विजयाची स्फूर्तिदायी वार्ता प्रजाजनांपर्यंत पोहोचवली जात असे.
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सनई_चौघडा" पासून हुडकले