"अर्नाळा किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २६:
==छायाचित्रे==
==गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे==
अर्नाळा किल्ला चौकोनी असून दहा मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी याचे संरक्षण करते. तटबंदीमध्ये असलेले बुरूज ताठपणे उभे आहेत. किल्ल्याला एकूण तीन दरवाजे असले तरी मुख्य प्रवेशद्वार उत्तरेकडे आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन बुलंद बुरूज उभे आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूला हत्तीची व वाघाची प्रतिमा कोरलेली आहे. दरवाजावरच एक शिलालेख आहे. या शिलालेखामधील ‘बाजीराव अमात्य मुख्य सुमती आज्ञापिले शंकर! पाश्चात्यासि वधूनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा!!’ या
त्र्यंबकेश्वर महादेवाच्या मंदिरासमोरच सुबक बांधणीचे एक अष्टकोनी तळे आहे. या शिवाय किल्ल्यात गोड्या पाण्याच्या विहिरीही आहेत. किल्ल्याच्या सभोवार लोकांची वस्ती असून त्यांची शेतीही आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जातांना बाहेरच्या बाजूला कालिकामातेचे मंदिर आहे. समुद्रकिनार्यावरुन किल्ल्याकडे पाहिले असता डाव्या बाजूला असणारा किल्ल्यापासून संपूर्ण सुटा असा एक गोल बुरूज आपले लक्ष वेधून घेतो. याच्या आत जाण्यास एक लहानसा दरवाजा आहे. संपूर्ण किल्ला बघण्यास अर्धा ते पाऊण तास लागतो. किल्ल्याच्या मजबूत तटबंदीवरुन किल्ल्याचे समोवार दर्शन घेत गोल फेरी मारता येते. मुख्य प्रवेशद्वाराच्या वर असणार्या उंचवटावर बसले असता पूर्ण किल्ल्याचा आवाका नजरेस पडतो.
==बुरजांची नावे==
यशवंत बुरुज, भवानी बुरुज, गणेश बुरुज आणि सुटा बुरूज (नाव नाही). गणेश बुरुज हा या किल्ल्यातील महत्त्वाचा बुरूज आहे. या बुरुजाच्या खली सैनिकांच्या राहण्याची सोय केलेली आहे. या गणेश बुरुजामध्येच एकापुढे एक असे तीन दरवाजे आहेत.
==गडावरील राहायची सोय==
|