"फिदाउल्ला सेहराई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: फिदाउल्ला सेहराई (जन्म : बगीचा धेरी (पेशावर), इ.स. १९२८; मृत्यू : पेशा...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
फिदाउल्ला सेहराई (जन्म : बगीचा धेरी (पेशावर), इ.स. १९२८; मृत्यू : पेशावर, १९ जून, इ.स. २०१६) हे एक पुरातत्त्व-अभ्यासक होते.
 
माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर फिदाउल्लाे पेशावरच्या ‘इस्लामिया कॉलेज’ (आता इस्लामिया विद्यापीठ) येथे शिकले आणि तेथून ब्रिटनमधील लायसेस्टरच्या महाविद्यालयात संग्रहालयशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यास करण्यासाठी गेले. ते मायदेशी परत आले तेव्हा पाकिस्तानचा जन्म झाला होता.
 
==पेशावरचा इतिहास==
पेशावर आणि या शहराचा इतिहास यांवरील फिदाउल्लांचेे अफाट प्रेम होते. पेशावरचे मूळ नाव पुष्पपूर. या शहराचा इतिहास गांधारकालीन आहे आणि तत्कालीन बौद्ध धर्माची छाप या शहराच्या इतिहासावर आह’ याची आठवण आयुष्यातील उमेदीची सारी वर्षे पुरातत्त्व-अभ्यासात घालवलेले प्रा. फिदाउल्ला सेहराई नेहमीच देत असत. ह्युएनत्संग (युआन श्वांग) हा चिनी प्रवासी पेशावरलादेखील इसवी सन ६३०मध्ये आला, तेव्हा या शहरात आता जेथे ‘गूंज गेट’ आहे, तेथे ४०० फुटी उंच स्तूप होता. हा स्तूप मुळात त्याही आधी दोनशे वर्षांपूर्वीचा, म्हणजे कनिष्क राजाच्या काळातला होता, अशा गोष्टी प्रोफेसर सहराई सांगत.
 
==पेशावरचा बौद्ध इतिहास==
फिदाउल्ला सेहराई मायदेशी परतले तेव्हा पाकिस्तानचा जन्म झाला होता. पेशावरच्या भागाच्या बौद्ध इतिहासाकडे आणि सहाव्या शतकापासूनच गांधार राजांचा पाडाव होऊ लागल्यानंतरही इतिहासाचेे अवशेष आज कसे टिकले आहेत याकडे फिदाउल्ला यांनीयांनीच जगाचे लक्ष वेधले.