"नामदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३:
''' संत नामदेव''' ([[इ.स. १२७०]] - [[जुलै ३]], [[इ.स. १३५०]]) हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते [[मराठी भाषा|मराठी भाषेमधील]] सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी [[पंजाबी भाषा|पंजाबी]] व [[ब्रज]] भाषांमध्येही काव्ये रचली. [[शीख धर्म|शिखांच्या]] [[गुरू ग्रंथसाहिब|गुरू ग्रंथसाहिबात]] त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत.
नामदेव हे
भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले. नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारा असा त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.
ओळ १९:
भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवानी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लढ्ढा, विष्णुस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवाची मंदिरे उभारलेली आहेत. `संत शिरोमणी' असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.
भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘पायरीचा दगड’ होण्यात त्यांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये (
==संत नामदेवांची अभंगगाथा==
"लबाड तूं देवा लबाड तूं देवा। लबाड तूं देवा ठावा आम्हां॥ काय थोरपण मिरविसी व्यर्थ। खोटेपणा स्वार्थ कळों आलें॥ हिता अनहिता केले आपस्वार्थ। वचन यथार्थ बोल आतां॥"
पंढरीचा विठुराया संत नामदेवांच्या कालखंडात म्हणजे १३व्या शतकातही (नामदेवांचा जन्म शके ११९२ म्हणजे सन १२७०मधला ) उभ्या मर्हाटी प्रांतातील बहुजन समाजाचे आराध्य दैवत होतेच. त्याची भक्ती आणि स्तुती
"लबाड तूं देवा लबाड तूं देवा। लबाड तूं देवा ठावा आम्हां॥ काय थोरपण मिरविसी व्यर्थ। खोटेपणा स्वार्थ कळों आलें॥ हिता अनहिता केले आपस्वार्थ। वचन यथार्थ बोल आतां॥" <br />
"देवा तुज आम्हीं दिधलें थोरपण। पाहें हें वचन शोधूनियां॥ नसतां पतित कोण पुसे तूतें। सांदिस पडतें नाम तुझें॥" <br />
ओळ ४१:
हे मंथन करताना नामदेवांमधला बंडखोर शस्त्रे खाली टाकतो आणि तो देवाचरणी लीन होतो. त्यांची महती हीच आहे. नामदेवांच्या बंडाच्या कथा श्रवण केल्यानंतर हा अभंग अंतर्मुख करायला लावणारा आहे. नामदेवांची थोरवी आणि वैचारिक प्रगल्भता त्यातच आहे . याच भावातील एक अभंग असाः <br />
"कांसवीची पिलीं राहती निराळीं । दृष्टि पान्हावली सुधामय॥ जैसा जवळूनि असेन मी दुरी । दृष्टि मजवरी असो द्यावी ॥ तान्हें वत्स घरीं वनीं धेनू चरे । परि ती हुंबरे क्षणोक्षणा ॥ नामा म्हणे सलगीनें करितों मी निकट । झणें मज वैकुंठ पद देसी ॥"
==नामदेवांसंबंधी आख्यायिका==
* नामदेव महाराज खूप लहान असताना, त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले `आज देवाला प्रसाद तू दाखव. त्या दिवशी नामदेवांनी नुसता नेवैद्य दाखविला नाही तर देवापुढे वाट बघत बसले की केव्हा हा खाईल. त्या अत्यंत निरागस अपेक्षेला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्यासमोर प्रगट झाले व नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी भक्षण केला.
* कुत्र्याने चपाती पळवली त्याला ती कोरडी खाऊ लागू नये म्हणून संत नामदेव महाराज, तुपाची वाटी घेऊन त्याच्यामागे लागले.
==नामदेवांचे साहित्य आणि नामदेवांसंबंधी लिहिले गेलेले साहित्य==
|