"वसुंधरा पेंडसे नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →पदे |
No edit summary |
||
ओळ १:
'''वसुंधरा पेंडसे नाईक''' (जन्म :२७ जून, इ.स.१९४६; निधन : मुंबई, १५ जुलै, इ.स. २०१६) या एक मराठी लेखिका आणि पत्रकार होत्या. [[अप्पा पेंडसे (पत्रकार)|पत्रकार अप्पा पेंडसे]] हे त्यांचे वडील होत. भारताच्या संघातर्फे आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळणारे क्रिकेटपटू [[सुधीर सखाराम नाईक]] हे त्यांचे पती होत.
वसुंधरा पेंडसे यांनी शालान्त परीक्षेत संस्कृतमध्ये सर्वाधिक गुण मिळवून जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती पटकावली.
१९९१ मध्ये त्या ‘नवशक्ति’ या दैनिकाच्या संपादक झाल्या तेव्हा मराठी पत्रकारितेत नवा अध्याय लिहिला गेला. एखाद्या मराठी दैनिकाच्या संपादक होणार्या त्या पहिल्या महिला पत्रकार ठरल्या. संपादकाला असलेल्या लिखाण स्वातंत्र्यावरच गदा येत असल्याचे दिसू लागल्याने वर्षभरातच त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. १९९४ ते ९६ या काळात ‘लोकसत्ता’मध्ये ‘कुटुंब कथा’ हे सर्वसाधारण कुटुंबात नेहमी उद्भवणार्या समस्यांची चर्चा करणारे त्यांचे सदरही वाचकप्रिय ठरले होते. या सदरातील लेखांचे नंतर पुस्तकही निघाले.
मुंबई दूरदर्शनवर संस्कृत भाषेचे सौंदर्य स्पष्ट करणारा वसुंधरा पेंडसे नाईक यांचा ’अमृतमंथन’ हा साप्ताहिक कार्यक्रम विशेष लोकप्रिय होता. हा कार्यक्रम इ.स. १९७९ ते १९९२ असा १३ वर्षे चालू होता. या कार्यक्रमात महाकाव्य, नाट्य
|