"मेंदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २२:
पानातील सेल्युलोजमधून रंगद्रव्ये विरघळून पसरण्यासाठी काही अवधी लागतो. त्यासाठी त्वचा चांगली रंगण्यासाठी मेंदीचा लेप ६ ते १२ तास व्यवस्थित राहणे आवश्यक असते. लॉसोनची प्रथिनांबरोबर रासायनिक अभिक्रिया घडून येते. त्यामुळे प्रथिने असणारे पदार्थ मेंदीमुळे चांगले व पक्के रंगतात. मानवी त्वचा, नखे आणि केसांमध्ये केराटिन नावाचे प्रथिन असते. याशिवाय चामड्याच्या वस्तू, रेशीम आणि लोकर रंगवण्यासाठीही मेंदीचा वापर होतो. आम्लाबरोबर मेंदीचा रंग आणखी गडद होतो म्हणूनच मेंदीचा वापर करताना लिंबू रस, चहा यांचा वापर केला जातो.
 
मेंदीच्या फुलांपासून हीना नावाचे अत्तर बनते. मेंदीची पेस्ट भाजले, कापले, खरचटले, कीटकदंश आदींनी त्वचेवर आलेल्या सुजेवर गुणकारी असते.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मेंदी" पासून हुडकले