"वंदना घांगुर्डे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: वंदना रवीन्द्र घांगुर्डे (माहेरच्या वंदना मधुकर पटवर्धन) या एक स...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
वंदना रवीन्द्र घांगुर्डे (माहेरच्या वंदना मधुकर पटवर्धन) या एक संगीत नाटकांत काम करणार्‍या मराठी गायिका आहेत. त्यांचे वडील मधुकर दत्तात्रेय पटवर्धन हे इंजिनिअर असून [[रत्‍नागिरी]]तील एक उद्योजक होत. पाचवीच्या वर्गातर असताना असताना डॉ. [[वसंतराव देशपांडे]] यांचे कट्यार काळजात घुसली हे नाटक पाहून वंदनाला संगीतातच करियर करावेसे वाटू लागले. वडिलांनी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले होते. पहाडी आवाजात ते भजने गात.
 
वंदना घांगुर्डे यांना लहानपणापासूनच गाण्याचे आणि नाटकांचे संस्कार मिळाले. त्यांची आजी गोड आवाजात भजने गायची. आई विद्या पटवर्धन (माहेरच्या विद्या जोग) या वंदनाला गाण्याच्या कार्यक्रमांना व नाटकांना घेऊन जात. मामा-दामोदर जोग, कार्तिक महिन्यातल्या उत्सवात गद्य वा संगीत नाटकांत प्रमुख भूमिका करत, आणि नाटकांचे दिग्दर्शनही करीत.
 
==संगीताचे प्राथमिक शिक्षण==
वंदना पटवर्धन यांचे [[रत्‍नागिरी]]त सुगम संगीताचे प्राथमिक शिक्षण मिळाले. शालेय जीवनात त्यांनी गायन, नृत्य, नाट्य, वक्तय्त्व स्पर्धांत अनेक बक्षिसे मिळवली. [[रत्‍नागिरी]] [[आकाशवाणी केंद्र|आकाशवाणी केंद्राच्या]] त्या बालकलाकार होत्या.
 
==पुण्यात आगमन, शिक्षण आणि विवाह==
घरच्या वडीलधार्‍या मंडळींचा विरोध डावलून वंदमा घांगुर्डे यांच्या आईने त्यांना [[पुणे|पुण्यात]] एस.एन.डी.टी. कॉलेजात गाणे शिकायला पाठवले. महाविद्यालयात असताना वंदनाला अनेक गायकांच्या मैफिली आणि दुर्मीळ ध्वनिमुदिका ऐकायला मिळाल्या. त्या एस.एन.डी.टी. महाविद्यालयातून बी.ए. (संगीत) झाल्या, त्यांचा डॉ. रवींद्र घांगुर्डे या संगीत-ज्ञानी माणसाशी विवाह झाला आणि त्या पुण्याजवळील [[चिंचवड]] येथे रहायला आल्या. विवाहानंतर त्यांच्या संगीत कारकीर्दीला नवीन दिशा मिळाली. त्या आपल्या पतीकडेच गायन शिकू लागल्या, पुढे डॉ. [[वीणा सहस्रबुद्धे]] आणि डॉ. विकास कशाळकर]] यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संगीत अलंकार ही पदवी मिळवली.
 
==नाट्यकारकीर्द==
गांगुर्डे परिवाराने १९५५ साली डॉ. [[वसंतराव देशपांडे]] वर्षिक स्मृती महोत्सवात अन्य काही कलाकारांना घेऊन [[संगीत मानापमान]] नाटकाचा प्रयोग केला.