"दीनानाथ मंगेशकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ७२:
* ब्रह्मकुमारी (लेखक : विश्वनाथ चिंतामण बेडेकर - [[विश्राम बेडेकर]])
* संन्यस्त खड्ग (लेखक : [[विनायक दामोदर सावरकर]])
==लेखन==
दीनानाथ मंगेशकर हे एक उत्तम ज्योतिषी होते. इ.स. १९२२ साली इंदूरच्या मुक्कामात असताना त्यांना ज्योतिषविद्येचा पहिला पाठ शंकरशास्त्री घाटपांडे या तेथील प्रसिद्ध ज्योतिषीबुवांकडून मिळाला होता. दीनानाथांनी ‘ज्योतिष आणि संगीत’ या विषयावरील ग्रंथ लिहायला घेतला होता. गायनाचा व ग्रहांचा शास्त्रशुद्ध संबंध कसा आहे, कोणता ग्रह कोणत्या स्वराचा स्वामी, त्याचप्रमाणे राग-रागिण्यांचे रंग, वर्णने, स्वरांच्या रंगांवरून त्यांचा निसर्गातील-सूर्यकिरणांतील रंगांशी, वेळेशी कसा संबंध लागतो आणि म्हणून अमूक वेळेला अमूक राग गाणे’ ही कल्पना कशी सिद्ध होते, यांवर त्या ग्रंथात माहिती असणार होती. सूर्योदयाचे आणि सूर्यास्ताचे राग-स्वर (वादी-संवादीच्या फरकाने) कसे तेच आहेत (उदा० देसकार-भलप-तोडी-मुलतानी) वगैरे छाननी त्यांनी या ग्रंथात केली होती. दुर्दैवाने ते लिखाण छापून प्रसिद्ध होण्यापूर्वीच गहाळ झाले.
==मास्टर दीनानाथ यांनी गायलेली व ध्वनिमुद्रिका असलेली गीते (कंसात रागाचे-नाटकाचे नाव)==
|