"पिसाचा कलता मनोरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २०:
इ.स.१३७२मध्ये मनोर्यातील घंटेची खोली बांधण्यात आली. सप्तसुरांशी निगडित सात घंटा इथे आहेत. तळमजल्याला पंधरा कमानी आहेत. त्यानंतरच्या सहा मजल्यांना प्रत्येकी ३० व शेवटच्या मजल्याला १६ कमानी आहेत. टॉवरची उंची बुटक्या बाजूने ५५.८६ मीटर व उंच बाजूने ५६.७ मीटर आहे. आतमधून जाणार्या गोल जिन्याला २९६ पायर्या आहेत. १९९० ते २००१च्या डागडुजीपूर्वी ५.५ अंशांनी कललेला मनोरा आता ३.९९ अंशांनी कलला आहे. म्हणजे तळमजल्यापेक्षा आठवा मजला ३.९९ अंशांनी झुकला आहे. त्याआधी मनोर्याचा झुकाव ओळंब्याच्या बाहेर साडेचार मीटर होता तो नंतर ३.८ मीटरवर स्थिर झाला. अत्यंत मोहक अशा पांढर्या संगमरवराच्या शुभ्र खांबांनी आणि जाळीदार झरोक्यांनी प्रत्येक मजला सुशोभित झालेला हा मनोरा त्याच्या सौंदर्यापेक्षा त्याच्यातल्या दोषामुळेच अधिक प्रसिद्धी पावला.
दुसर्या महायुद्धादरम्यान मित्र राष्ट्रांना असे कळले, की जर्मन लोक या मनोर्याचा उपयोग टेहळणी बुरूजासारखा करतात; परंतु ज्या अमेरिकन सार्जंटवर टॉवर उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी टाकली होती, त्याने तो उद्ध्वस्त न करण्याचा निर्णय घेतला. इ.स. १९८७मध्ये पिसाच्या मनोर्याला जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित करण्यात आले. ७ जानेवारी १९९०मध्ये लोकांसाठी हा मनोरा बंद करण्यात आला. वजन कमी करण्यासाठी सर्व घंटा काढून टाकण्यात आल्या. त्यानंतर तिसर्या मजल्याभोवती केबल्स आवळून त्या दूरवर रोवण्यात आल्या. टॉवर जमीनदोस्त होण्यापासून वाचण्यासाठी त्याच्या उंच भागाखालची ३८ क्युबिक मीटर(फक्त?) माती काढण्यात आली. दशकभराच्या प्रयत्नांनंतर डिसेंबर २००१मध्ये हा टॉवर पुन्हा खुला करण्यात आला. नंतर २००८मध्ये पुन्हा
[[गॅलिलिओ]]ने गुरुत्वाकर्षण सिद्ध करण्यासाठी अनेक प्रयोग ह्याच मनोऱ्यावरून केले होते. त्यासाठी त्याने या मनोऱ्यावरून दोन निरनिराळ्या वजनाचे धातूचे गोळे खाली टाकले होते. खाली पडणार्या वस्तूला लागणारा वेळ हा वजनावर अवलंबून नसतो, हे त्याला सिद्ध करायचे होते. तसेच पिसा शहरातील कॅथेड्रलमधील झुंबरांचे हेलकावे पाहून त्याला पेंड्युलमची कल्पना सुचली.
==पिसा शहरातल्या कलणार्या इतर इमारती==
पिसाच्या कललेला मनोर्याला एक वैज्ञानिक चमत्कार म्हणून जागतिक प्रसिद्धी मिळाली असली तरी, पिसा शहरवासीयांना याचे काही अप्रूप नाही; याचे कारण म्हणजे या मनोर्याशेजारचे सांता मारिया कॅथ्रेडल आणि बाप्टिस्ट्री यांच्या वास्तूसुद्धा अर्धा ते एक अंशातून कलल्या आहेत. एवढेच नाही तर शहरातील काही खासगी प्रासाद, सेंट मायकेल चर्च आणि सेंट निकोलाय चर्च यांचे बेल टॉवरसुद्धा एक ते दीड अंशातून झुकले आहेत. हा सर्व चमत्कार तिथल्या मूळच्या दलदलीच्या जमिनीमुळे झाला आहे.
[[वर्ग:इटलीमधील जागतिक वारसा स्थाने]]
|