"गुरुदेव रानडे महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''रामचंद्र दत्तात्रेय रानडे''' (जन्म : जमखिंडी, ३ जुलै, इ.स. १८८६, निधन : निंबाळ, ६ जून, इ. स. १९५७) हे [[तत्त्वज्ञान|तत्त्वज्ञानाचे]] प्राध्यापक व आध्यात्मिक मार्गदर्शक होते. त्यांनी ‘निंबर्गी संप्रदाय’ वाढविला. [[कर्नाटक|कर्नाटकातल्या]] [[विजापूर]] जिल्ह्यातील निंबाळ येथे त्यांनी आश्रम स्थापला.<ref>http://www.saamana.com/lekh/prasangik-8</ref> भारताचे राष्ट्रपती [[सर्वपल्ली राधाकृष्णन]] हे गुरुदेवांचे चाहते होते.
==शिक्षण==
रा.द. रानडे यांचे शालेय शिक्षण जमखिंडी येथील परशुरामभाऊ हायस्कुलात होऊन ते मॅट्रिकची परीक्षा जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवून १९०२ मध्ये उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी ते पुण्याच्या डेक्कन कॉलेजात आले व गणित हा विषय घेऊन बी. ए. आणि तत्त्वज्ञान विषय घेऊन एम.ए. झाले.
==व्यवसाय==
एम.ए. झाल्यानंतर रानडे यांनी काही दिवस त्यांनी [[पुणे|पुण्याच्या]] [[डेक्कन कॉलेज|डेक्कन कॉलेजातील]] हस्तलिखित ग्रंथालयाचे प्रमुख म्हणून काम केल्यावर १९१३ मध्ये त्यांची नेमणूक [[फर्ग्युसन कॉलेज]]ात इंग्रजीचे शिक्षक म्हणून झाली. १९२४ मध्ये त्यांनी [[डेक्कन एज्युकेशन सोसायटी]]च्या आजीव सभासदत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर ‘अॅकॅडमी ऑफ फिलॉसॉफी अॅन्ड रिलिजन’ ही संस्था स्थापन त्यांनी डॉ. बेलवलकर यांच्या सहकार्याने व मुंबई विद्यापीठाच्या पुढाकाराने भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासखंडांची योजना आखली; परंतु काही कारणांमुळे ती पूर्ण होऊ शकली नाही. १९२८ मध्ये अलाहाबाद विद्यापीठाचे तेव्हाचे कुलगुरू सर गंगानाथ झा यांनी त्यांना अलाहाबाद येथे सन्मानपूर्वक बोलावून घेतले व तेव्हापासून १९४३ मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत सुमारे २० वर्षे ते त्या विद्यापीठातील तत्त्वज्ञान-विभागाचे प्रमुख प्राध्यापक होते.
सेवानिवृत्तीनंतरचा काळ त्यांनी निंबाळ (जि. विजापूर, कर्नाटक) व अलाहाबाद या दोन ठिकाणी आलटूनपालटून घालविला.
==रा.द. रानडे यांनी लिहिलेली पुस्तके==
|