"हेमा लेले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: हेमा सुभाष लेले या माजी प्राध्यापक, कवी, बालसाहित्यकार आणि मराठी...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
हेमा सुभाष लेले या माजी प्राध्यापक, अभिनेत्या, कवी, बालसाहित्यकार आणि मराठी लेखिका आहेत.
 
हेमा लेले यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या रेणुकास्वरूप प्रशालेतून (मुलींच्या भावे स्कूलमधून) झाले. कॉलेजात असताना त्यांनी [[पुरुषोत्तम करंडक स्पर्धा]]ेत [[उदय लागू]] यांच्यासमवेत [[विजय तेंडुलकर]]ांच्या ‘रात्र’ एकांकिकेमध्ये काम केले होते. त्यानंतर त्यांनी ‘थिएटर अॅकॅडमी’च्या ‘तीन पैशांचा तमाशा’ आणि ‘पडघम’ या व्यावसायिक नाटकांतही भूमिका केल्या.
 
कवितांवर आधारित ‘वेळूचे बन’ आणि बालकवितांचा समावेश असलेल्या ‘चिमणगाणी’ या कार्यक्रम निर्मितीच्या हेमा लेले या सूत्रधार असत.
 
मुलांचे संगोपन केल्यावर आलेले अनुभव हेमा लेले यांनी ‘बागडणाऱ्या गुजगोष्टी’ या पुस्तकातून मांडले आहेत.
 
सुरभी कल्चरल अॅकॅडमीतर्फे हेमा लेले यांच्या ‘विचारांच्या निर्झराकाठी’ या पुस्तकाचे आणि ई-बुकसह ‘अरे संस्कार संस्कार’ या मालिकेतील १५ पुस्तकांच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते डॉ. [[मोहन आगाशे]] यांच्या हस्ते झाले होते. (२-३-२०१४)
 
==हेमा लेले यांची पुस्तके==
"https://mr.wikipedia.org/wiki/हेमा_लेले" पासून हुडकले