"शिरपूर पॅटर्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
 
शिरपूर परिसरातील शेतकरी वर्षात दोन ते तीन पिके घेत आहेत. १० वर्षात जलसंधारणाच्या कामावर ३० कोटी रुपये खर्च करण्यात आले. दोन एकरातील काकडी शेतकर्‍याला तीन महिन्यात तीन लाख रुपये मिळतात. दोन एकरातील भेंडी ४ लाख रुपये देते. त्यामुळे शेतकर्‍याची एकही आत्महत्या या भागात नाही.
 
तापी आणि पूर्णा नदीचा भाग हा गाळाचा प्रदेश आहे. पावसाचे पाणी अथवा धरण भरल्यानंतर वाया जाणारे पाणी शुद्ध करून, गाळून ते पाणी जर या भागांमधील कोरड्या विहिरीत वरून टाकले तर या विहिरींद्वारे ते पाणी जमिनीत जाऊन पाण्याची पातळी वाढू शकते. हे धुळे जिल्ह्यात सिद्ध झाले. सुरेश खानापूरकर यांनी शिरपूरमध्ये राबवलेल्या या पद्धतीनुसार कोरड्या विहिरीजवळ १० बाय १० फूट या आकाराचे २ टाके बांधले.. पहिले टाके रिकामे ठेवून व दुसर्‍या टाक्यात तळाशी गोल गोटे, त्यावर जाड रेती व नंतर बारीक रेती असे थर दिले.. पहिल्या टाक्यात पाणी आल्यावर त्याठिकाणी गाळ खाली बसला आणि ते पाणी दुसर्‍या टाक्यात गेले.. तेथे ते गाळले जाऊन टाक्याच्या तळाशी असलेल्या पाईपमधून विहिरीत गेले. या पद्धतीमुळे ६० हजार लिटर प्रतितास या वेगाने पाणी विहिरीत जाते, पण विहीर भरत नाही. या पद्धतीत १८ गावांमधील अजिबात पाणी नसलेल्या ५९ विहिरी निवडण्यात आल्या. पावसाळ्यात वाया जाणारे पाणी या विहिरींमध्ये टाकण्यात आले. सतत दोन महिने हा प्रयोग केल्यानंतर सुमारे २ किलोमीटर अंतरावरील कूपनलिका आणि विहिरींची पाण्याची पातळी शंभर ते दीडशे फूट वाढली.
 
शिरपूर तालुक्यात दीडशे गावांमध्ये हे काम सुरू आहे. जलसंधारणाच्या शिरपूर पॅटर्नमुळे बसाल्ट असलेल्या दगडातील पाण्याची पातळी जमिनीपासून २५ फुटावर आली. तापीच्या गाळाच्या प्रदेशातील २८० फुटावर असलेली पाण्याची पातळी ११० फुटावर आली. धरणाचे पाणी तर नाहीच आणि पावसाच्या पाण्याची हमी नाही, अशा कात्रीत सापडलेल्या शेतकर्‍याला तंत्रआधारित जलसंधारणाच्या माध्यमातून बारमाही पाणी उपलब्ध झाले.