"मधु कांबीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →पुरस्कार |
No edit summary |
||
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''मधू कांबीकर''' या ’शापित’ नावाच्या मराठी चित्रपटातून प्रसिद्धीस आलेल्या मराठी अभिनेत्री आहेत. त्या चित्रपटानंतर पुढे त्या ३० वर्षांहून अधिक वर्षे चित्रपटसृष्टीत ठामपणे अभिनय करत राहिल्या.
प्रतिकूल परिस्थितीत अभिनय सामर्थ्याच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान आणि वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कलावंत म्हणून मधू कांबीकर यांना ओळखले जाते. बीड जिल्ह्यातील कांबी गावापासून सुरू झालेल्या प्रवासात अनेक संकटे आली तरी त्यांनी धीर न सोडता आत्मविश्वासाने परिस्थितीवर मात केली. पूर्वी खेडोपाडी नाटके होत असत, तशी कांबी आणि आसपासही होत. कांबीकर याचे वडीलही कलाकार. ते त्यांना नाटकांना घेऊन जात. त्यातून त्यांची कलावंत म्हणून जडणघडण झाली. शाळेत त्यांचे मन रमले नाही. परंतु, तमाशाच्या फडात त्यांनी पायात चाळ बांधले आणि तिथल्या परीक्षेत मात्र त्या एकेक गड सर करीत गेल्या. अस्सल खानदानी लावणी सादर करता करताच त्या लावणीची परंपरा जपण्यासाठी आणि अस्सल लावणी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या अखंड प्रयत्न करीत राहिल्या.
लावणीच्या चाहत्या वर्गाला लावणीचा इतिहास कळावा, यासाठी त्यांनी लावणीबाबतचे जेवढे लिखित साहित्य आहे ते जमवून त्याद्वारे तमाशाचा इतिहास गुंफण्याचे महत्त्वाचे काम केले. हे अवघड काम यशस्वी करण्यासाठी मधू कांबीकरांना त्याच्या तमाशा फडातील ११ कलाकारांनी भरपूर मदत केली. या इतिहासावर आधारित असा ’सखी माझी लावणी’ हा कार्यक्रम कांबीकर रंगमंचावर सादर करतात.
कांबीकर यांनी पुण्यातल्या बाळासाहेब भोसले यांच्याकडून कथ्थकचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यातच त्यांची कला फुलली आणि रुजली. एवढेच नव्हे, तर त्यांना पेशवेकालीन परंपरा सादर करण्याचा मानही त्यांना मिळाला.
शापित चित्रपटाने कांबीकर यांच्यातल्या अभिनेत्रीची भारतीय चित्रपटसृष्टीलाही जाणीव झाली. त्यानंतर ३५ वर्षांनंतरही त्यांची त्यातील भूमिका रसिकांच्या स्मरणात आहे. पुढे तमाशातली लावणी थिएटरमध्ये आली आणि शहरी प्रेक्षकांनाही साद घालू लागली. मधू कांबीकर यांना मात्र लावणीचे हे नवे रूप फारसे रुचत नाही. शिवलेली साडी परिधान करून नाचणाऱ्या या ‘फॅन्सी लावणी सम्राज्ञी’ असल्याचे मत त्यांनी एकदा जाहीरपणे व्यक्त केले.
[[जब्बार पटेल]] यांनी 'एक होता विदूषक'मध्ये पारंपरिक लावणीचे दर्शन घडवण्यासाठी [[उषा नाईक]] आणि [[मधू कांबीकर]] यांना घेतले. 'भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गं बाई, श्रावणाचं उन्ह मला झेपेना' किंवा 'कुटं तुमि गेला होता सांगा कारभारी' या लावण्यांमधील मधू कांबीकरांची अदा अस्सल लावणी कलावंताची साक्ष देतात. 'एक होता विदूषक'प्रमाणेच 'झपाटलेला'मधील लक्ष्याच्या आईची भूमिका, तसेच संत गाडगेबाबांच्या जीवनावरील 'डेबू'चित्रपटातील डेबूच्या आईची भूमिकाही त्यांनी संस्मरणीय बनवली. दादा कोंडके यांच्यासोबत 'येऊ का घरात', 'मला घेऊन चला' हे चित्रपट करून त्यांनी आपण कोणत्याही प्रकारची भूमिका करू शकतो, हे दाखवून दिले होते.
==मधू कांबीकर यांनी काम केलेले चित्रपट ==
* अन्यायाचा प्रतिकार
* आई तुळजा भवानी
Line ५१ ⟶ ५९:
* दुर्गा म्हणत्यात मला
* देवाचिये द्वारी
* दोघी (१९९५)
* निर्मला मच्छिंद्र कांबळे (१९९९)
* बिन कामाचा नवरा (१९८४)
|