"दत्ता देसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दत्ता देसाई (जन्म : १४ एप्रिल, इ.स. १९५६) हे पाणी, शिक्षण, जनविज्ञान, आ...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
देसाई यांनी वाणिज्य शाखेतील पदवी घेतल्यानंतर सुरुवातीला काही काळ टेलिफोन खात्यात नोकरी केली. नंतर महाराष्ट्र व आंध्र बॅँकेत त्यांची निवड झाली. तेथे उपशाखाव्यवस्थापक पदापर्यंत ते पोहोचले. पण समाजकार्याची आवड असल्याने १९८३ मध्ये बॅँकेची नोकरी सोडून देऊन त्यांनी [[पुणे]] येथील समाज विज्ञान अकादमीत दीर्घकाळ पूर्ण वेळ सचिव म्हणून काम केले. या संस्थेच्या माध्यमातून दत्ता देसाई यांनी [[महाराष्ट्र]] राज्यातील २५ जिल्ह्यांंमध्ये विद्यार्थी-युवक, कामगार-कर्मचारी, शेतकरी, महिला तसेच सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी अभ्यास व प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली.
 
==देसाई यांनी केलेली अन्य कामे==
* भारत ज्ञानविज्ञान समिती व भारतीय जनविज्ञान आंदोलन या माध्यमांतून साक्षरता, जनवाचन आंदोलन, समता विज्ञान आंदोलन व शिक्षण हक्क चळवळ.
* आरोग्य साक्षरता, पर्यावरण या क्षेत्रांत सामाजिक कार्य
* जल व सिंचन धोरणे व हक्कविषयक समिती, महाराष्ट्र शिक्षण हक्क समिती, अन्न हक्क समिती वगैरेंवर काम
* लोक वैज्ञानिक दुष्काळ निर्मूलन व्यासपीठाचे ते सह-समन्वयक होते तर सर्वांसाठी आरोग्य या आंतररराष्ट्रीय अभियानाच्या अंतर्गत जन आरोग्य अभियानाचे ते राज्य समन्वयक होते.
* विविध क्षेत्रांत काम करताना त्यांचे लिखाणही सुरू असते. देसाई यांनी काही ग्रंथांचे सहलेखन तर काहींचे संपादनही केले.
 
==दत्ता देसाई यांनी लिहिलेली पुस्तके==
* आधुनिकतेचे आगमन : युरोपकेंद्री इतिहासाचा जागतिक विचार
* जलयुद्ध की क्रांती?
* महाराष्ट्रातील दुष्काळ
* महाराष्ट्रातील विकासाची दिशा : हवी नवी मळवाट
* शहीद भगतसिंगांवरील अनुवादित पुस्तक
 
==पुस्तिका==
* गोवंश हत्याबंदी
* पेटंट मक्तेदारी
* पाणी, दुष्काळ आणि विकास
* बुवाबाजीवर प्रकाशझोत
* भारतीय शेती आणि डंकेल नीती
 
==पुरस्कार==
* डॉ. [[राम आपट]]े प्रबोधन पुरस्कार (२००३)
* कॉ. [[गोविंद पानसर]]े प्रबोधन पुरस्कार देसाई (२०१६)