"सायन्स अँड सोशल इनइक्वॅलिटी (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११:
 
पुस्तकातील पहिल्या विभागामध्ये लेखक वंश व वसाहतोत्तर विज्ञान अभ्यास क्षेत्रातील टीकांचा आढावा घेत आधुनिक पाश्चात्त्य विज्ञानाची चिकित्सक मांडणी करतात तसेच या टीकांमधील, विज्ञानात मुलभूत बदल घडवून आणण्याची विहित क्षमताही दाखवून देतात. मेरी ए.आर्मस्ट्राँगच्या मते या विभागातील ६ प्रकरणे ही पाश्चात्त्य विचारवंत व वैज्ञानिकांनी, ज्यांच्यामुळे पश्चिमेचे इतरत्र जगावर असलेले भौतिक व सामाजिक नियंत्रण झाकोळले गेले अशा पूर्वीपासूनच्या संकल्पनात्मक साधनांची उत्कृष्ट पद्धतीने चिकित्सा करतात; व तसेच त्यांना मोडून काढण्यास प्रश्न उपस्थित करयाय.<ref> Armstrong, M. A. (2008). Review. NWSA Journal, Vol. 20, No. 3, New Orleans: A Special Issue on Gender, the Meaning of Place, and the Politics of Displacement , 221-227.</ref> पहिल्या प्रकरणात लेखक वांशिकदृष्ट्या शोषित समाजाला त्यांनी विज्ञानाविरुद्ध सुरुवात केलेल्या विरोधाच्या प्रकल्पांचे(शोषित समाजाने तीन पद्धतीने विज्ञानाच्या व्यवहार व तत्वज्ञानाला विरोध केलेले दिसते. वांशिक विषमता नैसर्गिक आहे असे वैज्ञानिक संशोधनाद्वारे सिद्ध करणे, विज्ञानातील तंत्राचा वांशिक द्वेष ठेवून केलेला गैरवापर व दुरुपयोग, विज्ञानाच्या संरचनेत युरोपियन वंशातील नसलेल्या लोकांना दुर्लक्षित व परीघावर ठेवणे आदीं व्यवहारांची टीका) महत्त्व व मुल्य दाखवून देतात तसेच युरोपियन वंशातील लोकांना स्वतःबाबत पूर्ण माहिती मिळवण्यास सुद्धा या प्रकल्पांची कशी मदत होऊ शकते हेही दाखवून दिले आहे. दुसऱ्या प्रकरणात लेखक मांडतात की, शोषित जगातील प्रश्न, 'इतर आधुनिक विज्ञानातून' सुटू शकतात व ते इतर संस्कृतीत घडू शकते. येथे त्या विज्ञानाच्या जडणघडणीत संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करतात व त्यांच्या मते पाश्चिमात्य विज्ञानाने डोळे उघडून पाहिल्यास इतर ज्ञानाच्या व्यवस्थाही निर्माण होणे शक्य आहे. 'दोन्ही डोळे उघडून (With both eyes open) या प्रकरणात त्या मांडतात की उत्तरेकडील विज्ञान व इतर संस्कृती पुढे आणल्यास आपल्याला इतर संस्कृतीतील वैज्ञानिक वारसा पूर्णतया समजून घेण्यास मदत होईल तसेच उत्तरेकडील संस्कृतीमध्ये नवीन शोधाच्या शक्यताही निर्माण होतील. युरोपकेंद्री तत्त्वज्ञानामुळे जगाला एका डोळ्याने आंधळे ठेवलेले आहेच पण सोबतच दुसऱ्या डोळ्याचे विकृत चित्रण करून विज्ञानाला विस्तारणाच्या शक्यताही संकुचित केल्या आहेत.
 
पुढील प्रकरणात आधुनिक उत्तरार्धातील विज्ञानाला स्त्रीवाद्यांनी दिलेल्या आव्हानांचा आढावा घेतलेला दिसतो. उत्तरार्धातील विज्ञानाचे तत्वज्ञान हे स्त्रियांबाबत कसे भेदभाव करते हे दाखवून दिले आहे. या पद्धतीनी लेखिकेने पहिल्या भागात पाश्चात्य स्त्रीवादी विज्ञान व तंत्रज्ञान अभ्यासाद्वारे केलेल्या चिकित्सक दृष्टिकोनाचा व नवीन पर्यायांचा आढावा घेतलेला आहे व विज्ञानातील धोरणांना आव्हान देण्यासाठी भूमिदृष्टीच्या सिद्धांताला एक प्रभावी साधन व 'उपयोगी असे स्वचिकित्सेची ज्ञानमीमांसा’ निर्माण करणारे म्हणून प्रोत्साहन दिलेले आहे.
पुस्तकातील दुसऱ्या भागात विज्ञान हे 'मुल्य निरपेक्ष' व 'कुठलेही राजकीय जाणीव नसलेले' या धारणांवर भाष्य केलेले आहे. या विभागातील विविध प्रकरणांमध्ये वैज्ञानिकांमध्ये निहित 'राजकीय नेणीवा' (लोकशाही समर्थक व लोकशाहीविरोधी असे दोन्हीही आहेत) उलगडून दाखविलेल्या आहेत. त्या दाखवून देतात कि या 'राजकीय नेणीवेमुळे' संपूर्ण जगात वाढणाऱ्या सामाजिक चळवळींना विज्ञानाची काहीच मदत झालेली नाही याउलट सर्व लोकशाही विसंगत प्रकल्पांना विज्ञानाची मदत झालेली दिसते. त्याअर्थी विज्ञानाने जगातील 'भांडवली प्रकल्पांसाठी जग सुरक्षित' बनवण्याचे काम केले असे दिसते. पुढे त्या 'विज्ञानाचे ऐक्य' या प्रारूपाचे विरोध करतात. या प्ररुपामुळे जगामध्ये इतर संस्कृतीमध्ये निर्माण झालेल्या वैज्ञानिक ज्ञानाचे (विशेषतः जागतिक दक्षिण भूखंडातील राज्य व परिघावरील समुदाय) अस्तित्वच नाकारले जाते. सदरची धारणा हि इतर ज्ञानाचे अवमूल्यन करते व तर्काचे युरोपियन परिमाण संपूर्ण जगावर लादते. पुढील प्रकरणात त्या आधुनिक पाश्चात्य विज्ञानातील 'सत्याचे आदर्श' व 'वस्तुनिष्ठता' या धारणांवर भाष्य करत लेखिका आग्रह धरतात कि विज्ञानाला नेहमीच 'विशिष्ठ सांस्कृतिक संकल्पनात्मक ढाचेत व व्यवहारातून' निर्माण होणारे ज्ञान म्हणून पाहिले पाहिजे. या आग्रहाद्वारे त्या आधुनिक पाश्चत्य वैज्ञानिकांद्वारे टिकवून ठेवलेल्या 'वस्तुनिष्ठतेवरील' विश्वासावर व केवळ एक 'सत्याचे आदर्श' या धारणांना प्रश्नचिन्ह उभे करतात. पण शेरीन कलोव यांच्या मते लेखिका सत्यापेक्षा वस्तुनिष्ठ्तेच्या भाषेला अधिक प्राधान्य देतात.<ref> Clough, S. (April-June 2008). Review. Hyptia, Vol. 23, Noo.2, Just War , 197-202</ref> लेखिका वस्तूनिष्ठ्तेच्या दाव्याला पूर्णपणे सोडत नाहीत तर त्यांच्या मते संशोधकाची सांस्कृतिक व सामाजिक पार्श्वभूमी सुद्धा संशोधन प्रक्रियेत दृश्य झाली पाहिजे व यामुळे संशोधनाची प्रक्रिया अधिक सुदृढ होवून वस्तुनिष्ठता वाढेल. येथे विज्ञानाचे बहुसांस्कृतिक स्वरूप स्वीकारल्यामुळे उद्भवणाऱ्या सापेक्षतावादाच्या प्रश्नालाही त्या हाताळतात. शेरीन क्लोवच्या मते लेखिकेचा विश्वास आहे कि स्थानिक पातळीवरील ज्ञानाला स्थान दिल्यास सत्य, काटेकोरपणा व वस्तुनिष्ठता या धारणांबाबत अधिक स्पष्टता येईल.
=='''प्रतिक्रिया व योगदान'''==
एलिसन वेलीच्या मते या पुस्तकातील युक्तिवाद 'सामाजिक रचनावादी (social constructionist) (ज्ञान हे निर्मित होणारे नसून ते रचले जाते)<ref>http://groundedtheoryreview.com/2012/06/01/what-is-social-constructionism/</ref> ' भूमिकेत बसणारा आहे.<ref> http://www.jstor.org/stable/25483228</ref> शार्लीन कुकच्या मते हार्डिंगचे निष्कर्ष हे पाश्चात्य [[विज्ञान]] नष्ट करू पाहत नाहीत किंवा त्याच्या मूल्याचे अवमूल्यन ही करू पाहत नाहीत. तर उलट त्या विज्ञानाच्या सामाजिक स्थानाची, विज्ञानाचे जगातील अर्थव्यवस्थेसाठी होणारे दुरुपयोगाची दखल व सामाजिक न्यायासाठी त्याचे मुल्य वाढवण्याला प्रोत्साहन देतात.<ref>http://jstor.org/stable/41669853</ref> आर्मस्ट्राँग या पुस्तकाला काही ठिकाणी विस्कळीत व स्व- संदर्भ देणारे मांडतात. पण त्यांच्या मते एकंदरीत हे पुस्तक एक संदर्भ कार्य, स्त्रीवादी वैज्ञानिक अभ्यास क्षेत्रातील महत्वाच्या चर्चांचा ऐतिहासिक आढावा देणारे व या चर्चांना एक नवीन व महत्वपूर्ण अवकाश प्रदान करण्याचा प्रयत्न करणारे म्हणून महत्वपूर्ण आहे.
=='''संदर्भ सूची'''==
{{reflist}}
[[वर्ग:स्त्री अभ्यासातील संहिता]]