"शिवसेना" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! |
No edit summary |

ओळ २३:
शिवसेनेची स्थापना [[बाळासाहेब ठाकरे]] यांनी १९ जून १९६६ रोजी केली.

▲१९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षांनी भारतात भाषेनुसार राज्यांची निर्मिती करण्यात आली. [[मराठी]] आणि [[गुजराती]] लोकांना मात्र भाषिक [[राज्य]] मिळाले नाही. ते मिळवण्यासाठी तत्कालीन [[मुंबई]] प्रांतामधे [[संयुक्त महाराष्ट्र|संयुक्त महाराष्ट्राच्या]] निर्मितीसाठी मोठी चळवळ झाली.
शेवटी,
=====निवडणूक १९९५=====
१९९५ मध्ये सेना-[[भाजप]] युतीने महाराष्ट्राची [[निवडणूक]] जिंकली. सरकारी ताकद मिळाल्यानंतर शिवसेनेने " शिवसेना राज्यप्रमुख परिषद" तयार केली.
ओळ ३३:
==निवडणूक चिन्ह==
"धनुष्यबाण" हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे.
==[[पुष्पा भावे]] यांची शिवेसेना आणि [[बाळ ठाकरे]] यांच्याबद्दलची मते==
आयबीएन लोकमतवर निखिल वागळेंनी ६ मार्च २०१० रोजी घेतलेल्या मुलाखतीत [[पुष्पा भावे]] यांनी शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचे आपले सडेतोड विचार व्यक्त केले. त्यांच्या मते:

१. बाळासाहेब ठाकर्यांनी गेली चाळीस वर्षे मराठी मनाचे ब्लॅकमेलिंग यापलीकडे काहीही केले नाही. मराठी माणसाला 'तू पीडित आहेस, तुझ्यावर अन्याय होतो आहे' असे ब्रेनवॉशिंग शिवसेनेने केले, पण प्रत्यक्षात मराठी माणसाला पुढे आणण्यासाठी ठोस असे काहीही शिवसेनेने, आणि विशेषतः बाळासाहेब ठाकर्यांनी केले नाही. ज्या दादर बांद्र्यात शिवसेनेनेने मराठी माणसाला उचलून धरल्याचा दावा केला, त्या भागात अमराठी दुकानांची आजची संख्या चाळीस वर्षांपूर्वीच्या संख्येपेक्षा अधिक आहे.

२. गेल्या चाळीस वर्षात महाराष्ट्रातील सांस्कृतिक र्हासाचे प्रमुख कारण म्हणजे शिवसेना. शिवसेनेनेने अर्वाच्च, गलिच्छ आणि शिवराळ भाषेचे उदात्तीकरण केले. कायदा धाब्यावर बसवण्याचा राजरोसपणा शिवसेनेने महाराष्टाच्या राजकारणात आणला. 'सामना' मधील कित्येक उतार्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, पण बाळासाहेब ठाकर्यांना अटक करणारा माईका लाल अजून जन्माला यायचा आहे, ही मस्तवाल भाषा आणि गुर्मी शिवसेनेने महाराष्ट्रात प्रथम सुरु केली.

३. शिवसेनेचे मराठी कैवाराचे धोरण स्वतःला सोईस्कर आणि धरसोडीचे आहे. मुंबईत मराठी माध्यमातून सुरू झालेल्या काही महाविद्यालयीन अभ्यासक्रमांना पहिला विरोध शिवसेनेचा होता.

४. शरद पवार शिवसेनेची ताकद ओळखण्यात अपयशी ठरले. शिवसेनेला ताब्यात ठेवणे त्यांना शक्य असूनही त्यांनी (कदाचित काही वेगळी राजकीय समीकरणे डोक्यात असल्याने) ते केले नाही. त्यांच्या जेव्हा ते ध्यानात आले, तेव्हा फार उशीर झाला होता.

६. राज ठाकरेंना मिळणारा प्रतिसाद ही चाळीस वर्षे शिवसेनेत राहून भ्रमनिरास झालेल्यांची प्रतिक्रिया आहे. राज ठाकरेही बाळासाहेब ठाकर्यांप्रमाणेच उथळ आणि सवंग वक्तृत्व या एकाच अस्त्रावर लोकप्रिय होत आहेत. फरक इतकाच वाटतो, की त्यांच्या मागे जाणारे आता चाळीस वर्षे थांबणारे नाहीत. ते लवकर हिशेब मागतील.

शिवसेनेने ज्यांची ज्यांची कल्हई केली त्यांना सोन्याचे दिवस आले, असे इतिहास सांगतो. भुजबळ राणेंपासून सचिन तेंडुलकरांपर्यंतची उदाहरणे आहेत. [[पुष्पा भावे]] या तर फार पूर्वीपासून शिवसेनेच्या हिटलिस्टवर होत्या. त्यांना बाळासाहेब ठाकर्यांनी ज्याला 'खास ठाकरी भाषा' असे कौतुकाने म्हटले जाते त्या भाषेत 'हडळ' वगैरे म्हणून घेतले आहे. पुष्पा भावेंच्या या मुलाखतीत ठाकरेंबद्दलचा राग नव्हता, दिसली ती फक्त दया. मरणासन्न अवस्थेतल्या, दात आणि नखे झडून गेलेल्या आणि तरीही सोन्याचा पिंजरा सोडू न शकणार्या वाघाकडे बघताना वाटावी अशी दया.
==शिवसेना गीत==