"भगतसिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२५:
* विदाउट फिअर, द ट्रायल ऑफ भगतसिंग (इंग्रजी, कुलदीप नय्यर)
* शहीद भगतसिंग (मूळ इंग्रजी लेखक - कुलदीप नय्यर, मराठी अनुवाद - भगवान दातार)
 
==कुलदीप नय्यर यांच्या पुस्तकाची कहाणी==
जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या करणारे जिंदा आणि सुखा या दहशतवाद्यांनी ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांना एक पत्र पाठवून ‘आम्ही भगतसिंग यांच्यासारखेच क्रांतिकारक आहोत’ असा दावा केला होता. नय्यर यांनी भगतसिंग यांच्याबद्दल एका वृत्तपत्रात लेख लिहिला होता. त्या लेखाची प्रतिक्रिया म्हणून या दोघांनी हे पत्र लिहिले होते. या पत्रामुळे नय्यर साहजिकच अस्वस्थ झाले. ‘भगतसिंग यांचा लढा आणि त्यांचे आयुष्य लोकांसमोर नेमकेपणानृ मांडलेच पाहिजे अन्यथा अनेक दहशतवादी आपली तुलना त्यांच्याशी करायला लागतील,’ या विचाराने भगतसिंग यांचं चरित्र लिहिण्याचा निर्धार त्यांनी केला आणि तो तडीसही नेला.
 
भगतसिंग यांच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती गोळा करून हे चरित्र लिहिण्याचा नय्यर यांचा प्रयत्न होता. त्यासाठी ते पाकिस्तानात गेले. भगतसिंग-सुखदेव-राजगुरू या तीन क्रांतिकारकांना ज्या तुरुंगात ठेवण्यात आले होते, तसेच त्यांना जिथे फाशी देण्यात आली होती, त्या ठिकाणांना नय्यर यांनी भेट दिली. या क्रांतिकारकांची स्मृती सांगणारे आता तिथे काहीही नाही. १९३१ मध्ये २३ मार्च या दिवशी या तिघांना फाशी दिली गेली. त्यांची समग्र माहिती देता यावी, यासाठी नय्यर यांनी त्यांच्यासंबंधीच्या कागदपत्रांबाबत पाकिस्तान सरकारशी पत्रव्यवहारही केला होता; पण त्यांना ती कागदपत्रे मिळाली नाहीत. लंडनमधल्या ‘इंडिया ऑफिस लायब्ररी’मध्ये यासंबंधीची काही कागदपत्रे होती; पण तीदेखील नय्यर यांना मिळू शकली नाहीत. तुरुंगात असताना भगतसिंग यांनी आपली भूमिका आणि आपला लढा स्पष्ट करणारी चार पुस्तके लिहिली होती. या पुस्तकांची हस्तलिखिते मिळवण्याचा नय्यर यांनी प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्नही निष्फळ ठरला.
 
नय्यर यांनी या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. भगतसिंग आणि सुखदेव यांच्या भावांशी त्यांनी संपर्क साधून माहिती मिळवली. हे करताना धक्कादायक माहिती पुढे येत गेली. सुखदेव यांच्या भावाला पंजाब पोलिसांनी खूप त्रास दिला होता, त्यामुळे त्यांना गाव सोडावे लागले होते. जवळजवळ सात वर्षं नय्यर यांनी या पुस्तकासाठी काम केले. अनेकांच्या भेटी घेऊन, विविध ठिकाणच्या कागदपत्रांचा अभ्यास करून हे चरित्र त्यांनी लिहिले. ‘विदाउट फिअर : लाइफ अॅन्ड ट्रायल ऑफ भगतसिंग’ या शीर्षकाने इंग्लिशमध्ये आलेल्या या पुस्तकाचा भगवान दातार यांनी केलेला अनुवाद ‘शहीद’ या शीर्षकाने रोहन प्रकाशनातर्फे भगतसिंग यांच्या जयंतीच्या निमित्ताने, २८ सप्टेंबर २०१५ रोजी प्रसिद्ध झाला.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/भगतसिंग" पासून हुडकले