"प्रभा गणोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
डॉ. प्रभा रामचंद्र गणोरकर (जन्म : ८ जानेवारी, इ.स. १९४५) या एक मराठी लेखिका, कवयित्री व साहित्यसमीक्षक आहेत. त्या सासवड येथे होणाऱ्या ८७व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या. त्या वेळी
प्रभा गणोरकर मूळ अमरावतीच्या. लहानपणी पहाटेच्या काकडआरतीपासून रात्रीच्या भजनापर्यंत, आणि अमरावतीतील कृष्णमंदिरातल्या ताईमहाराजांच्या कीर्तनापर्यंत, भुलाबाईच्या गाण्यापासून ते रेडिओतून येणाऱ्या गीतांपर्यंत कविता प्रभा गणोरकरांच्या कानावर पडत असे, आणि सहजगत्या पाठ होत असे.
==शाळा-महाविद्यालयातील कविता लेखन==
प्रभा गणोरकरांना शाळेत असल्यापासून कविता वाचायचा नाद लागला होता, पण तेव्हा कवितासंग्रह त्यांच्या हाती लागले नव्हते. पाठ्यपुस्तकांतून, मासिकांमधून कविता वाचायला मिळायची, पण कवी माहीत नव्हते.
नववीत असताना एकदा शाळेत मास्तरांनी कवितेच्या दोन ओळी दिल्या आणि कवितेचे एक कडवे घरून लिहून आणायला सांगितले तेव्हा दोन ओळींशी जुळणारे चार ओळींचे एक कडवे रचताना गणोरकरबाईंना खूपच झुंज द्यावी लागली होती.
प्रभा गणोरकर कॉलेजात आल्यावर बोरकर, पाडगावकर, बापट, करंदीकर, [[इंदिरा संत]]; नंतर मर्ढेकर, बालकवी, [[गोविंदाग्रज]], [[केशवसुत]] हे सगळे कवी त्यांना संग्रहांतून भेटू लागले.
पहिल्या काळात गणोरकरांना बोरकरांनी फारच प्रभावित केले, नंतर इंदिरा संतांनी. १९६०-६१ मध्ये कॉलेजच्या पहिल्या-दुसऱ्या वर्षाला असताना जॆव्हा त्या कविता लिहू लागल्या तेव्हा या दोघांसारखी असायची. ही अनुकरणातून आलेली कविता अर्थात छापली गेली नाही.
==प्रभा गणोरकर याणची पहिली स्वतंत्र कविता==
एक दिवस सायकलवरून घराकडे परतता परतता गणोरकरांना अचानक ओळी सुचल्या :<br/>
ऊन वेचता वेचता कशी झाली संध्याकाळ, घन सांधायला जाता सारे संपले आभाळ.<br/>
स्वत:च्या भावना, स्वत:चे शब्द असलेली ही साधी अष्टाक्षरी छंदातली, आठ ओळींची कविता त्यांनी घरी येऊन लिहून काढली. ही पहिली कविता. त्यामुळेच पुढेही त्यांनी प्रचंड कविता वाचली पण अनुकरण कधीही करायची इच्छा झाली नाही. त्याचबरोबर अगदी अनावर उत्कटपणे काही जाणवले तरच ते शब्दांतून येऊ लागले.
==प्रभा गणोरकर यांनी लिहिलेली पुस्तके==
|