"जिवा महाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
[[चित्र:Jiva mahala.jpg|thumb|right|शिवाजी महाराजांवर अफझलखान हल्ला करताना त्यांना वाचविणारा जिवा महाला (भगव्या वस्त्रात)]]
 
'''जिवा महाला''' हा [[प्रतापगडाची लढाई|प्रतापगडाच्या लढाईत]] [[शिवाजी|शिवाजीराजांचे]] प्राण वाचवणारा वीर होता.
 
==गाव==
जिवाचे मूळ गाव कोंडवली बुद्रुक (मौका/खारे) हे वाई तालुक्यात आहे. मात्र हे गाव धोम धरणामुळे स्थलांतरित झाले आहे. प्रसिद्ध इतिहासंशोधक श्री.पांडुरंग नरसिंह पटवर्धन यांनी जिवा महाले यांचे महाबळेश्वरजवळ[[महाबळेश्वर]]जवळ कोंडवली या गावी त्यांचे वंशज शोधून काढले आहेत.
 
==घराणे==
जिवा महाले आणि शिवा काशीद हे दोघेही महार समाजातील होते. वंशावळ – जिवा महालेचा मोठा भाऊ हा तान (तानाजी) महाले असावा. जिवा महालेचा मुलगा सीताराम; सीतारामचा मुलगा (सुभानजी); सुभानजीचे (नवलोजी व काळोजी); नवलोजीचा मुलगा हरी आणि काळोजीचा मुलगा सुभानी होय..
 
हरी आणि सुभानजी हे जिवा महालेचे खापरपणतू होतात.
 
==पराक्रम==
शिवाजीने प्रतापगडाच्या पायथ्याशी [[अफझलखान|अफझलखानास]] मारल्यावर अफझलखानाच्या 'सय्यद बंडा' नावाच्या रक्षकाने शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला. परंतु जिवा महाल्याने मध्ये पडून तो वार झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. या प्रसंगी जिवा महालेचे वय २५च्या घरात असावे असा कयास काढण्यात येतो.
 
 
 
‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’, ही म्हण या प्रसंगावरून पडली.