"शीर्षक गीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: चित्रपटाच्या अगदी सुरुवातीला किंवा दूरचित्रवाणीच्या कार्यक्र... |
No edit summary |
||
ओळ ३:
आज दूरचित्रवाणीच्या मनोरंजन वाहिन्यांवरील मालिकांची शीर्षक गीते लोकप्रिय असली तरी त्याचा खरा पाया हा सरकारी वाहिनी दूरदर्शनने घातला. अगदी सुरुवातीच्या काळातील ‘हमलोग’, ‘बुनियाद’, सुरभि’, ‘मालगुडी डेज्’, ‘रामायण’, ‘महाभारत’ या हिंदी मालिकांची तर ‘गोटय़ा’, ‘संस्कार’ ‘दामिनी’, ‘महाश्वेता’, ‘परमवीर’, हॅलो इन्स्पेक्टर’, ‘स्वामी’ आदी मराठी मालिकांची शीर्षक गीते ही त्यातील काही ठळक उदाहरणे म्हणता येतील. ’गोटय़ा’ मालिकेचे ‘बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे बियाणे रुजावे माळरानी खडकात’, ‘संस्कार’ मालिकेचे ‘तेज स्पर्शाने दूर होई अंधार जैसा मुळांचा वृक्षा असे आधार, शिल्पास आकारी जैसा शिल्पकार, मना घडवी संस्कार’ किंवा ‘स्वामी’ मालिकेचे ‘माझे मन तुझे झाले तुझे मन माझे झाले’ ही शीर्षक गीते आजही अनेकांच्या ओठावर आहे. संगीतकार व गायक श्रीधर फडके यांनी गायलेल्या ‘संस्कार’ मालिकेच्या शीर्षक गीताची फर्माईश आजही श्रीधर फडके यांना त्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमात केली जाते.
अल्फा मराठी
पुढे ‘झी मराठी’वरील जवळपास सगळ्याच मालिकांची शीर्षक गीते गाजली, रसिकांच्या ओठावर रुळली आणि अनेकांच्या स्मार्ट भ्रमणध्वनीची कॉलर ट्यून झाली. ‘झी मराठी’ पाठोपाठ ‘ई टीव्ही मराठी’ (आत्ताची कलर्स मराठी), ‘मी मराठी’ (या वाहिनीचे ‘मी मराठी, मी मराठी’ हे शीर्षक गीतच गाजले), ‘स्टार प्रवाह’ आदी मराठी मनोरंजन वाहिन्यांवरील अनेक मालिकांची शीर्षक गीते लोकप्रिय झाली. यात ‘राजा शिवछत्रपती’, अग्निहोत्र’ (स्टार प्रवाह), तसेच ‘अवंतिका’, ‘वादळवाट’, ‘आम्ही सारे खवय्ये’, ‘कळत नकळत’, ‘उंच माझा झोका’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘असंभव’, (सर्व झी मराठी) या सह अन्य विविध मालिकांच्या शीर्षक गीतांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मालिकांच्या या शीर्षक गीतांनी रोहिणी निनावे, श्रीरंग गोडबोले, सौमित्र, गुरु ठाकूर, अरुण म्हात्रे, अश्विनी शेंडे, नीतीन आखवे असे चांगले तरुण गीतकारांबरोबरच अशोक पत्कींपासून ते नीलेश मोहरीर, राहुल रानडे अशा संगीतकारांची नावं घराघरात लोकप्रिय केली. तर देवकी पंडित, स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे, वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, रवींद्र साठे अशा गायक व गायिकांनी या शीर्षक गीतांना मोलाचे महत्त्व प्राप्त करून दिले आहे.
==दूरचित्रवाणी मालिकांची काही लोकप्रिय शीर्षकगीते==
* चालले होते सुखाने, वाहे उधाण वारे; पाऊले नेती कुठे? हे रस्ते - अनोळखी सारे; कोणता करार ज्याचे बंधन झाले...; जीवघेणा हाच बंध... (अनुबंध)
* दिवसामागून रात्र धावते सकाळ-संध्याकाळ; सूत्रधार जो या सार्याचा नाव तयाचे काळ; काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा; क्षणांत होते संभव सारे क्षणापूर्वीचे, असंभव। (असंभव)
* आम्ही म्हणजे, तुम्ही म्हणजे, तुम्ही-आम्ही सारे. ज्यांना पोट आहे, तोंड आहे, जीभ आहे, सोस आहे चमचमीत खाण्याचं, ते- आम्ही सारे खवैय्ये ! (आम्ही सारे खवय्ये)
* ऋतु सोबतीने सारी जुनी झाडे नवी होता; पानेफुले सांगतात ऊन-पावसाची कथा (ऊन पाऊस)
* आठवणींचा लेऊन शेला नटून बसली माय मराठी; दिवस झेलतो सुसाट वारा तरीही दिव्यात जिवंत वाती; जगण्यामधल्या अर्थासंगे बहकुन गेले अक्षर-रान; वार्यावरती थिरकत आले झाडावरुनी पिंपळपान (पिंपळपान)
[[वर्ग:मराठी दूरचित्रवाणी मालिका]]
|