"तंजावूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६:
}}
 
'''तंजावर''' (तमिळ:[[तंजावूर]] ; तमिळः தஞ்சாவூர் रोमनलिपी:Thanjavur/Tanjore)हे भारतातील [[तमिळनाडू]] राज्यातील [[तंजावर जिल्हा|तंजावर जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. हे शहर [[कावेरी नदी]]च्या दक्षिण तीरावर आहे.
 
== इतिहास ==
ओळ ३३:
 
=== चोळ राजांनंतर ===
चोळांनी स्थापन केलेले तंजावर राज्य पुढे पांड्य, दिल्ली सुलतान, विजयनगर, मदुराई नायक आणि तंजावर नायक यांच्या अंमलाखाली आले. तंजावर नायक राजा विजयराघव याचा खून झाल्यावर त्याच्या मुलाने आपले राज्य परत मिळविण्यासाठी विजापूरच्या आदिलशाहकडे मदत मागितली. त्या काळात शहाजी राजे भोसले यांचा मुलगा व्यंकोजी उर्फ एकोजी आदिलशाहकडे नोकरीस होता. आदिलशाहने व्यंकोजीला सैन्य देऊन तंजावर नायकाला राज्य परत घेण्यास मदत करण्यासाठी पाठविले. परंतु व्यंकोजीने तंजावर येथे जाऊन तंजावर आपल्याच ताब्यात घेऊन स्वतंत्र सत्ता स्थापन केली.
 
===भोसल्यांचे राज्य===
व्यंकोजी उर्फ एकोजी भोसलेची राजकीय कारकीर्द इ.स. १६७४ ते १६८४ अशी झाली. व्यंकोजी हे शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ. व्यंकोजीनंतर तंजावर गादीवर अनुक्रमे पहिले शाहूजी, पहिले सरफोजी, तुकोजी, प्रतापसिंह आणि तुळाजी यांची कारकीर्द झाली.
 
तुळाजीच्या कारकीर्दीत कर्नाटकच्या नवाबाने तंजावरवर आक्रमण करून कबजा केला. त्यावर तुळाजीने ईस्ट इंडिया कंपनीची मदत घेऊन नवाबाकडून आपले राज्य परत मिळवले. पुढे गादीवर आलेल्या दुसर्‍या सरफोजीने ब्रिटिशांची मदत घेऊन आपल्या चुलत्यापासून संरक्षण मिळविले.
 
===संस्थान खालसा===
ब्रिटिशांनी १७९९ साली तंजावर संस्थान खालसा करून मद्रास प्रेसिडेन्सीत सामील करून घेतले. १७९९ ते १८३२ या काळात हे दुसरे सरफोजी राजे नामधारी राजा बनून राहिले.
परंतु सरफोजींच्या साहित्यिक अभिरुचीबद्दल आणि त्यांनी स्थापन केलेल्या ‘सरस्वती महाल’ ग्रंथ संग्रहालयामुळे ते आजही सन्‍मानपात्र आहेत. ही ‘पब्लिक लायब्ररी’ असून आजही तेथे ६० हजारांहून अधिक मराठी, संस्कृत आणि अन्यभाषांतली दुर्मीळ पुस्तके आणि हस्तलिखिते आहेत.
 
== भूगोल ==
==प्रेक्षणीय ठिकाणे==
"https://mr.wikipedia.org/wiki/तंजावूर" पासून हुडकले