"चौल-रेवदंडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १३:
==चौलमधील भेट देण्यासारखी स्थळे==
* रामेश्वर मंदिर : रामेश्वर हे चौलचे ग्रामदैवत आहे. मंदिराचे छत उतरत्या कौलांचे बनले आहे. देवळाच्या पुढ्यात नंदीमंडप, दीपमाळ आणि रेखीव पुष्करणी आहे. कोकणातील मंदिर वास्तुशैलीचा हा उत्तम नुमना म्हणता येईल. मूळ मंदिराची निर्मिती कधी-कोणी केली याची माहिती मिळत नाही, पण मराठेशाहीत [[नानासाहेब पेशवे]], मानाजी आंग्रे, विसाजीपंत सुभेदार यांनी वेळोवेळी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे तपशील मिळतात.
 
या मंदिराच्या सभामंडपात फरशीखाली पर्जन्य, वायू आणि अग्नी अशा नावांची तीन कुंडे आहेत. दुष्काळ पडला, पाऊस आटला की, ‘पर्जन्य’, वारा पडला-गदगदू लागले की ‘वायू’ आणि थंडी-गारठा वाढला की, उर्वरित ‘अग्नी’ कुंड उघडायचे. गावातील त्या-त्या गोष्टींची उणीव ही कुंडे भरून काढतात, अशी मान्यता आहे. पर्जन्यकुंड १७३१, १८७६ आणि १९४१ मध्ये उघडल्याच्या नोंदी आणि त्या-त्यावेळी चौलवर पाऊस पडल्याची माहिती मिळते.