"मोहन जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
मोहन जोशींना लहानपणापासूनच नाटकात काम करण्याची आवड होती. त्यामुळे वडिलांनीही नाटकात काम करण्याची परवानगी दिली. नाटकात काम करण्याचा प्रारंभ त्यांनी १९६६ म्हणजे इयत्ता सहावीत असल्यापासून केला. नाटक सुरू असताना ते बी.कॉम. झाले. पदवीधर झाल्यावर पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून किर्लोस्कर कंपनीत नोकरीला लागले. पण नाटकाच्या दौर्‍यांसाठी सुट्या लागायच्या आणि त्यासाठी प्रत्येकवेळी खोटे बोलणे अपरिहार्य झाले. एक दिवस व्यवस्थापकाजवळ त्यांचे बिंग फुटले आणि त्यांनी नोकरी किंवा नाटक यापैकी एक निवडायला सांगितले. मोहन जोशी यांनी शांतपणे विचार करून दुसर्‍या दिवशी नोकरीचा राजीनामा दिला.
 
ज्योती जोशी यांच्याशी मोहन जोशींचे लग्न झाले आणि ते त्यांना घेऊन आपल्या अभिनय कारकीर्दीसाठी मुंबईत आले. ’कुर्यात्‌ सदा टिंगलम्‌’ हे मोहन जोशी यांचे व्यावसायिक रंगभूमीवरचे पहिले नाटक होय. त्यापूर्वी त्यांनी शालेय जीवनात गाणारा मुलुख आणि थीफ पोलीस हा एकांकिकांत काम केले होते. कॉमर्स कॉलेजात असताना मोहन जोशी यांनी काका किशाचा, तीन चोक तेरा, डिअर पिनाक आणि पेटली आहे मशाल या नाटकांत कामे केली होती.
 
नाटकाने पोट भरेल अशी स्थिती नव्हती त्यामुळे स्वत:चा ट्रक घेऊन मोहन जोशी ड्रायव्हर झाले. आठ वर्षे ड्रायव्हर म्हणून काम केले. पुढे ‘एक डाव भुताचा’ या पहिल्या मराठी चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली, आणि शेवटी ते अभिनयक्षेत्रात स्थिरावले.
 
==मोहन जोशी यांची भूमिका असलेली नाटके==
===बालनाट्ये===
* इकडम्‌ तिकडम्‌ विजयी विक्रम
* गाणारा मुलुख (एकांकिका)
* जंगलातील वेताळ
* टुणटुण नगरी खणखण राजा
* तिसमारखाँ
* थीफ पोलीस (एकांकिका)
* नीलमपरी
* बुडत्याचा पाय खोलात
* ययाती आणि देवयानी (बालनट)
* राजकन्या नेत्रादेवी (व्यावसायिक बालनाट्य)
 
===कॉलेज जीवनातील नाटके/एकांकिका===
* काका किशाचा
* डिअर पिनाक
* तीन चोक तेरा
* पेटली आहे मशाल
 
===हौशी नाट्यसंस्थांची नाटके===
* इन्व्हेस्टमेंट (एकांकिका)
* तिला मृत्यू द्या (एकांकिका)
* काचसामान जपून वापरा (एकांकिका)
* नाथ हा माझा
* मला खून करायचाय
* सावल्या
 
===हौशी प्रायोगिक नाट्यसंस्थांची नाटके===
* अचानक
* एक शून्य बाजीराव
* गार्बो
* सू्र्योदयाच्या प्रथम किरणापासून सूर्यास्ताच्या अंतिम किरणापर्यंत
 
==व्यावसायिक नाटके===
{{multicol}}
* आग्र्‍याहून सुटका
* आंधळी कोशिंबीर
* आसू आणि हसू
* एकटी मी एकटी
* एकदा पहावंकरून
* कथा कुणाची व्यथा कुणा
* करायला गेलो एक
* कलम ३०२
* कार्टी काळ्जात घुसली
* कुर्यात्‌ सदा टिंगलम्‌ : (मोहन जोशी यांचे व्यावसायिक रंगभूमीवरचे पहिले नाटक)
* काळोखाच्या सावल्या
* कुर्यात्‌ सदा टिंगलम्‌
* गाढवाचं लग्न
* गुड बाय डॉक्टर
* गोड गुलाबी
* गोष्ट जन्मांतरीची
* घरोघरी हीच बोंब
{{Multicol-break}}
* झालं गेलं गंगेला मिळालं
* तरुण तुर्क म्हातारे अर्क
* ती फुलराणी
* थँक यू मिस्टर ग्लाड
* थोडंसं लॉजिक
* देखणी बायको दुसर्‍याची
* धर्मयुद्ध
* नाती गोती
* नाथ हा माझा
* पुरुष
* प्रीतिसंगम
* प्रेमाच्या गावा जावे
* फिल्म स्टुडिओ मुंबाय
* बुढ्ढा होगा तेरा बाप
* मनोमनी
* महामेरू
{{Multicol-break}}
* माझ छान चाललंय ना
* मा राष्ट्रपती
* माहितेय तुम्ही कोण आहात!
* मी रेवती देशपांडे
* मृगया
* मोरूची मावशी
* रायगडाला जेव्हा जाग येते
* लफडं सोवळ्यातलं
* लष्कराच्या भाकर्‍या
* वय लग्नाचं
* श्री तशी सौ
* सारंगा तेरी याद में
* सुखवस्तू
* सुखान्त
* हे फूल चंदनाचे
{{Multicol-end}}
 
 
==मोहन जोशी यांचा अभिनय असलेल्या दूरचित्रवाणी मालिका==
"https://mr.wikipedia.org/wiki/मोहन_जोशी" पासून हुडकले