"देवकी पंडित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मृत दुव्याची विदागारातील आवृत्ती शोधली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''देवकी पंडित''' या [[मराठी]] गायिका आहेत. सुरुवातीला आईकडे-उषा पंडित- यांच्याकडे शिकल्यानंतर त्यांनी वयाच्या ननव्या वर्षापासून पं. वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे काही काळ संगीताचे [[शिक्षण]] घेतले. त्यानंतर[[किशोरी आमोणकर]], व [[जितेंद्र अभिषेकी]] यांच्याकडे शिकायची संधी त्यांना मिळाली. गुरूंकडून सतत शिकत रहावे या वृत्तीने त्या पुढेहा [[बबनराव हळदणकर]], डॉ अरुण द्रविड यांची मार्गदर्शन घेत राहिल्या.
 
पंडित वसंतराव कुलकर्णीकडे शिकत असताना ते पूर्वीच्या गायकांची उदाहरणे द्यायचे. पूर्वी गायक कसे १२-१२ तास रियाज करत असत हे सांगायचे. एकदा ते दोन महिन्यांकरता बाहेरगावी जात असताना रियाज व्यवस्थित चालू ठेवण्यास सांगून गेले. तेव्हा देवकी पंडित यांनी ते ते इतके मनावर घेतले, की भरपूर रियाज करायचा एवढा एकच विचार मनात ठेवून त्या गात राहिल्या. दोन महिने सतत गायल्यामुळे त्यांचा आवाज बंदच झाला. त्यानंतर त्या जवळजवळ तीन वर्षे गाऊच शकल्या नाहीत. त्या दोन-तीन वर्षांच्या काळात देवकी पंडित तंबोरा लावून बसायच्या आणि गाता येत नसल्याने केवळ तंबोर्‍याचे सूर ऐकत राहायच्या. त्या काळात त्यांनी सगळ्यांची खूप गाणी ऐकली. तंबोरा योग्य रीतीने कसा लावला पाहिजे, खर्ज, पंचम कसा लावायचा या गोष्टी पुन्हा पुन्हा करून त्यांनी आत्मसात केले. याच काळात देवकी पंडित हार्मोनियम व तबला शिकल्या.
 
==शीर्षकगीते==
देवकी पंडित यांनी अनेक हिंदी-मराठी दूरचित्रवाणी मालिकांची शीर्षकगीते गायिली आहेत. त्यांपैकी काही मालिकांची नावे -
* अवघाचि संसार (कवयित्री - रोहिणी निनावे, संगीत - अशोक पत्की)
* आभाळमाया (कवी [[मंगेश कुळकर्णी, संगीत - [[अशोक पत्की]])
* जगावेगळी
* जिवलगा (कवी - [[संदीप खरे]], संगीत - [[अशोक पत्की]])
* तुझ्याविना (कवी - नितीन आखवे, संगीत - [[अशोक पत्की]], सहगायक - [[स्वप्‍नील बांदोडकर]])
* बंधन (कवी - [[सौमित्र]], संगीत - [[अशोक पत्की]], सहगायक - [[सुरेश वाडकर]])
* मंथन (कवी - [[मंगेश कुळकर्णी]], संगीत - [[अशोक पत्की]])
* मानसी (कवी - [[मंगेश कुळकर्णी]], संगीत - [[अशोक पत्की]])
* वादळवाट (कवी - मंगेश कुळकर्णी, संगीत - [[अशोक पत्की]], सहगायक - [[स्वप्‍नील बांदोडकर]])
* हसरतें (हिंदी मालिका, संगीत - [[सुधीर मोघे]])
 
==देवकी पंडित यांनी गायिलेली चित्रपट गीते==
* जाळीमधी झोंबतोया गारवा (कवी - [[ना.धों. महानोर]], संगीत - [[आनंद मोडक]], चित्रपट - एक होता विदूषक, सहगायक - [[रवींद्र साठे]])
* तुम्ही जाऊ नका हो रामा (कवी - [[ना.धों. महानोर]], संगीत - [[आनंद मोडक]], चित्रपट - एक होता विदूषक, सहगायक - [[आशा भोसले]])
* वादळे उठतात किनारे (कवी - [[सौमित्र]], संगीत - [[अशोक पत्की]], चित्रपट - आईशप्पथ...!)
* सप्तसुरांनो लयशब्दांनो जगेन तुमच्यासाठी ([[सुधीर मोघे]], संगीत - [[आनंद मोडक]], चित्रपट - राजू)
* सूर्यनारायणा नित्‌ नेमाने उगवा ((कवी - [[ना.धों. महानोर]], संगीत - [[आनंद मोडक]], चित्रपट - एक होता विदूषक)
 
 
==देवकी पंडित यांनी गायलेली भावगीते==
* माझी उदास गीते तू ऐकतोस का रे? (कवी - [[सुरेश भट]])
* रंगुनी रंगात सार्‍या (कवी - सुरेश भट, संगीत - [[सुधीर मोघे]])
 
 
== बाह्य दुवे ==