"भास" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १०:
==भासाची नाटके==
रामायण- महाभारत या प्राचीन महाकाव्यांतून वेचक नाटय़बीजे उचलून भासाने आपल्या स्वतंत्र प्रतिभेने ती नाट्यरूपाने फुलविली. त्याशिवाय लोकवाङ्मयाच्या आधाराने त्याने दोन नाटके रचली; त्यांतले ‘चारुदत्त’ हे नाटक ‘संगीत मृच्छकटिक’च्या रूपाने मराठी रसिकांना चांगलेच परिचित आहे. उदयन हा भासाच्या अगोदर इतिहासात होऊन गेलेला लोकप्रिय राजा. त्याच्याविषयी प्रचलित असलेल्या आख्यायिकांना अनुसरून भासाने दोन नितांत सुंदर नाट्यकृती रचल्या. याखेरीज कृष्णचरित्रावर आधारित आणखी एक नाटक त्याने लिहिले आहे. नुसते नाट्यविषयांचे वैविध्य हेच भासाचे वेगळेपण नसून भासाचे प्रत्येक नाटक आपल्या वेगळेपणामुळे उठून दिसणारे आहे.
कृष्णाजी लक्ष्मण सोमण ह्यांनी भासाची नाटके १९३१ साली पहिल्यांदा मराठीत आणली. (भासाची नाटके अर्थात भासकवीचा मराठीत अवतार) त्यानंतर बळवंत रामचंद्र हिरगांवकर ह्यांनी भासनाटकांचे गद्यपद्यात्मक मराठी भाषांतर केले आहे (भास कवीची नाटके). मृच्छकटिक आणि पिया बावरी ही मराठी नाटके भासाच्या नाटकावर आधारित आहे.
==भासाच्या नाटकांची यादी==
Line ३३ ⟶ ३५:
==भासाची मराठीत रूपांतर झालेली नाटके===
* '''चारुदत्त''' -
* '''मध्यमव्यायोग''' - मराठी/हिंदीत : पिया बावरी (लेखन-दिग्दर्शन-संगीत : [[वामन केंद्रे]])
|