"संजय पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''संजय पवार''' हे चित्रकार, जाहिरातकार आणि मराठी नाटककार, स्तंभलेखक, संवाद लेखक आणि पटकथा लेखक आहेत. त्यांनी ’सिंधूताई सपकाळ’ या चित्रपटासाठी दोन पुरस्कार मिळाले आहेत. ’मुक्ता’, ’सातच्या आत घरात’, ’डोंबिवली फास्ट’, आणि ’मी शिवाजीराजे बोलतोय’ या गाजलेल्या चित्रपटांचे संवादलेखन संजय पवार यांनी केले होते. त्यांनी लिहिलेल्या ’कोण म्हणतो टक्का दिला’, ’गाईच्या शापाने’ आणि ’१९७४ आणि एके ४७’ या एकांकिकांनी रंगभूमीवर वादळ उठवले होते.
'''संजय पवार''' यांना २०१२ सालचा दया पवार स्मृति [[पुरस्कार]] प्रदान करण्यात आला आहे. पाच हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संजय पवार यांना ’ठष्ट’ या नाटकाच्या लेखनासाठी मॅजेस्टिक प्रकाशनाचा विसाव्या वर्षीचा [[जयवंत दळवी]] पुरस्कार देण्यात आला. (२४-९-२०१५)
संजय पवार हे तिसर्या [[सम्यक साहित्य संमेलन|सम्यक साहित्य संंमेलनाचे]] अध्यक्ष होते.
==संजय पवार यांनी लिहिलेली नाटके==
* आम्ही जातो आमुच्या गावा (या नाटकाचा पहिला प्रयोग जोधपूर येथे २२-११-१९९१ रोजी झाला)
* कोण म्हणतं टक्का दिला?
* चाळ कमेटी (एकांकिका)
* ठष्ट
* दोन अंकी नाटक (या नाटकाचा पहिला प्रयोग आराधना नाट्य संघाने राज्यनाट्यस्पर्धेत डिसेंबर १९८४ मध्ये केला.)
[[वर्ग:मराठी नाटककार]]
|