"गणेशोत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २९:
अशा रितीने धार्मिक पातळीवर लोकांना यशस्वीरीत्या एकत्र आणल्यानंतर टिळकांनी धर्मनिरपेक्ष विषयांवर लोकांना एकत्रित करण्याचे प्रयत्न चालू केले. ज्यामुळे लोकांमधील आत्मविश्वास परत येऊ शकेल असा त्यांना विश्वास वाटला, अशा शिवाजी महाराजांच्या स्वरूपात त्यांना एक आदर्श व्यक्ती दिसली. याचा फायदा करून घेऊन टिळकांनी महाराष्ट्रात शिवाजीजयंतीची सुरुवात तर केलीच, शिवाय भारतभर दौरे करून लोकांना शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर देशभरात, विशेषतः बंगालमध्ये शिवाजीजयंतीचा उत्सव जोराने सुरू झाला.
==पुण्यातील गणेश विसर्जन उत्सवाचा इतिहास==
एकेकाळी गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पुण्यात लोकांची गर्दी होत असे. आजही विसर्जन मिरवणुकीचा उत्साह कमी झालेला नाही. सन १८९३ पासून पुण्यातील सर्व गणपतींची एकत्र विसर्जन मिरवणुकीची परंपरा आहे. पुण्यातील या गणपती विसर्जन मिरवणुकांचा इतिहास मंदार लवाटे यांनी ‘पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव १२१ वर्षांचा’ हा पुस्तकात दिला आहे. विसर्जन मिरवणुकीसंबंधीची दुर्मीळ छायाचित्रेरं आणि मिरवणुकीसंदर्भात घडलेल्या विविध घटनांची माहिती पुस्तकात आहे.
==बाह्य दुवे==
|