"यशवंत कानिटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: यशवंत कानिटकर (जन्म : लिंबागणेश-मराठवाडा, १२ डिसेंबर १९२१; मृत्यू :...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
यशवंत कानिटकर (जन्म : लिंबागणेश-मराठवाडा, १२ डिसेंबर १९२१; मृत्यू : मुंबई, २२ जुलै, २०१५) हे एक मराठी भाषातज्ञ असून मुंबईतील सचिवालयात भाषासंचालक होते.
 
भाषा संचालक या नात्याने भाषाविषयक प्रश्नावर राजभाषा, परिभाषा, अनुवाद, कोशरचना आदी स्वरूपाचे तसेच 'व्यक्तिचित्रे'विषयकही विपुल लेखन केले होते.
 
शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी कानिटकर हैदराबादला गेले. उस्मानिया विद्यापीठातून प्रावीण्यासह त्यांनी मराठी विषयात एम.ए. केले. ग्रंथावर विलक्षण प्रेम असल्याने मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेतील उत्तमोत्तम व दर्जेदार पुस्तकांचे त्यांचे वाचन सुरू होते. दुसरीकडे काव्यलेखनही चालू होते. मराठी तरुणांसाठी 'प्रतिष्ठान' हे मासिक तेव्हा हक्काचे व्यासपीठ होते. तेथे यशवंत कानिटकरांच्या अनेक कविता प्रसिद्ध झाल्या.