"दीपक डुबल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ११:
२०११ मध्ये पीएच.डी. मिळाल्यावर डॉ. दीपक यांनी दक्षिण कोरियातील ग्वांगजू इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी येथे दोन वर्षे संशोधक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांची निवड जर्मनीच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा 'अलेक्झांडर व्हॉन हंबोल्ट' फेलोशिपसाठी झाली. त्याअंतर्गत त्यांनी जर्मनीतील केम्निट्झ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथे दोन वर्षे संशोधन केले. पुढे जगातील आणखी एका प्रतिष्ठेच्या 'मेरी क्युरी' फेलोशिपसाठी त्यांची निवड होऊन दीपक डुबल हे स्पेन येथील संस्थेत संशोधन करण्यासाठी गेले.
डॉ. डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या दोन स्पॅनिश आणि एक ब्राझिलियन विद्यार्थी पीएचडी करत आहेत.
==जागतिक मान्यता==
संशोधक म्हणून जागतिक मान्यता असण्यासाठी त्या व्यक्तीचा [[एच इंडेक्स]] मोठा असावा लागतो. डॉ. डुबल यांच्या नावावर एक युरोपियन आणि एक स्पॅनिश अशी दोन पेटंट्स जमा असून विविध आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे ९० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या शोधनिबंधांची दोन हजारांहून अधिक सायटेशन्स झाली असून त्यांचा [['एच इंडेक्स]]' २७ इतका आहे.
एका शोधनिबंधाला किमान दहा सायटेशन्स मिळाल्यानंतर त्याची दखल घेणार्या 'आय टेन इंडेक्स' मध्ये त्यांचा इंडेक्स ४९ इतका सशक्त आहे. 'नेचर' या संशोधन पत्रिकेत त्यांचे तीन शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीच्या 'केमिकल सोसायटी रिव्ह्यू' या ३३.३८ इतका इम्पॅक्ट फॅक्टर असणार्या विज्ञानपत्रिकेत त्यांचा 'हायब्रीड मटेरिअल्स फॉर हायब्रीड डिव्हाइसेस' हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. 'रिसर्च गेट' वरून सुमारे १८ हजार संशोधकांनी त्यांचे शोधनिबंध डाऊनलोड केले आहेत तर १३ हजार संशोधकांनी पाहिले आहेत. रिसर्चगेटवरील त्यांचा स्कोअर ३७.१६ इतका उत्तम आहे.
==सन्मान आणि पुरस्कार==
डॉ. दीपक प्रकाश डुबल यांची जागतिक विज्ञानपत्रिकांच्या यादीत अग्रमानांकित असणार्या ''नेचर पब्लिशिंग ग्रुप' च्या संपादकीय मंडळावर निमंत्रित म्हणून निवड झाली आहे.
[[वर्ग:भारतीय शास्त्रज्ञ]]
[[वर्ग:इ.स. १९८६ मधील जन्म]]
|