"राघवेंद्र गदगकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
 
कीटकांच्या वर्तनाबाबत डब्ल्यू.डी. हॅमिल्टन यांनी १९६४ मध्ये जे संशोधन केले ते पुढे नेण्यात गदगकर यांचा मोठा वाटा आहे. कीटकांच्या अभ्यासासाठी त्यांनी तीन दशकांपासून सक्रिय संशोधन गटही स्थापन केला असून कीटकांच्या उत्क्रांतीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्‍न केला आहे.
 
==सेंटर फॉर काँटेंपररी स्टडीज==
प्रा. राघवेंद्र गदगकरांनी बंगलोरला इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या संस्थेत, सेंटर फॉर काँटेंपररी स्टडीज नावाचे अभ्यासकेंद्र स्थापन केले आहे. तेथे कवी संवाद कसा साधतात, सध्याचे प्रश्न इतिहासातून कसे सोडवता येतील, वैज्ञानिकही कवीच्या भाषेत संवाद साधू शकतील का, अशा भन्नाट कल्पनांवर आधारित शिक्षण दिले जाते.
 
==राघवेंद्र गदगकर यांनी लिहिलेली पुस्तके==
* सामाजिक जीवशास्त्र व कीटकांचे वर्तन या विषयातील नवीन संशोधनाची माहिती देणारे ’सव्‍‌र्हायव्हल स्ट्रॅटेजीज’ हे पुस्तक.
* द सोशल बायॉलॉजी ऑफ रोपालिडिया मार्गिनाटा - टोअर्ड्‌स अंडरस्टॅन्डिंग द इव्होल्युशन ऑफ सोशॅलिटी
 
==सन्मान आणि पुरस्कार==
त्यांच्या जगावेगळ्या संशोधनाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांपैकी काही हे :-
* जर्मनीने त्यांना काही संस्थांचे सदस्यत्व दिले आहे.
* जर्मनीने दिलेला क्रॉस ऑफ ऑर्डर ऑफ द मेरिट हा मानाचा नागरी सनमान.
* इ.स. २००६ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे ते परदेशी सदस्य म्हणून निवडले गेले.
* १९९३ मध्ये त्यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्काराने गौरवण्यात आले
 
{{DEFAULTSORT:गदगकर, राघवेंद्र}}
[[वर्ग:जीवशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:भारतीय जीवशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:भारतीय शास्त्रज्ञ]]
[[वर्ग:शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार विजेते]]
[[वर्ग:इ.स. १९५३ मधील जन्म]]