"मारुती चितमपल्ली" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३५:
==बालपण==
चितमपल्ली यांचा जन्म सोलापुरातला. त्यांचे वास्तव्य गुजराथीमिश्रित मराठी बोलणार्यांच्या वाड्यात होते. त्यांचे आजोबा सोलापुरातल्या बुधवार पेठेत राहत. तेथे तेलुगू बोलणार्यांची वस्ती होती. मुस्लिमबहुल वस्तीही जवळच होती. त्यामुळे आई वडील आणि मुले मराठी, गुजराती, तेलुगू आणि उर्दूमिश्रित हिंदी बोलू लागली. मारुती चितमपल्ली वयाच्या नवव्या वर्षी शाळेत जाऊ लागले. पाचव्या इयत्तेतील स्कॉलरशिपमुळे
महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर चितमपल्लींनी त्यांची वही मराठीच्या प्राध्यापकांना दाखवली, आणि तिच्यातली एक कथा महाविद्यालयाच्या नियतकालिकात प्रकाशित झाली.
वडिलांना वाचण्याची आवड तर आईला अरण्यवाटांची. आई, वडील, आत्या, मामा यांच्याबरोबर रानवाटेने चालताचालता जंगलांबद्दल आकर्षण वाटू लागले. ’क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे उडे बापडी’ ह्या कवितेतील कारुण्य शाळेत असताना जाणवले, आणि जंगलांतील पक्ष्यांविषयी प्रेम वाटू लागले. आयुष्यभर हरणाची शिकार करणार्या भीमाचा मृत्यू हरणासारखा तडफडत झाला ही आईने सांगितलेली गोष्ट आयुष्यभर विसरता येण्यासारखी नव्हती. आईला पशुपक्ष्यांची खूप माहिती होती. चंडोइल ऊर्फ माळचिमणी, कोकिळा ऊर्फ कोयाळ, सातबहिणी ऊर्फ बोलांड्या, लावा ऊर्फ भुरगुंज्या अशी कितीतेरी नावे चितमपल्लींना आईकडून ऐकायला मिळाली. हरणाच्या नराला काळवीट आणि लांडग्याच्या मादीला लासी असा नर-मादीतला फरक तिनेच शिकविला. माळढोक हे नाव पहिल्यांदा आईनेच ऐकवले. तिने दिलेले [[रंग|रंगांच्या]] छटांचे ज्ञान पाखरांच्या आणि फुलपाखरांच्ये वर्णन करताना उपयोगी पडले.
लिंबामामा हा मारुती चितमपल्लींचा अरण्यविद्येतला पहिला गुरू. त्याने
ग्रंथ संपदा:
|