"रायरेश्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
रायरेश्वर गड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून गडाचा विस्तार १६ किलोमीटर लांब पसरला आहे. रायरेश्वर मंदिराजवळ असलेल्या सर्वात उंच टेकडीच्या माथ्यावरून चौफेर दृश्य दिसते. उत्तरेला तुंग, तिकोना, लोहगड व विसापूर डोंगर दिसतात. तसेच प्रतापगड, केंजळगड, कमळगड, विचित्रगड व मकरंदगड दिसतात. येथे ५-७ विविध रंगाची माती आढळते. पश्चिमेकडे नाखिंदा टोक म्हणजेच नाकेखिंडीचे रोमांच उभे करणारे दृश्य पहावयास मिळते.
 
==भौगोलिक स्थान==
रायरीचे पठार [[भोर]]पासून ८ किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे. दाट झाडी, खोल दर्‍या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट, यांमुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे.
 
==इतिहास ==
याच रायरेश्वराच्या डोंगरावर शिवाजीने स्वराज्याची शपथ घेतली.
 
==गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे ==
रायरेश्वरावर पाहण्यासारखे फार काही नाही. रायरेश्वराचे [[पठार]] हे ५ ते ६ कि.मी. पसरलेले आहे. त्यामुळे या पठारावरील वर्षाऋतूत पाहण्यासारखे असते. रायरेश्वरावर शंभुमहादेवाचे मंदिर लक्षात येत नाही. पठारावर अलिकडेच गावं वसलेली आहेत. पठारावर [[भात]] शेतीचे प्रमाणही मोठे आहे. [[पांडवगड]], [[वैराटगड]], [[पाचगणी]], [[महाबळेश्वर]], [[कोल्हेश्वर]], [[रायगड]], [[लिंगाणा]], [[राजगड]], [[तोरणा]], [[सिंहगड]], [[विचित्रगड]], [[पुरंदर]], [[रुद्रमाळ]], [[चंद्रगड]], [[मंगळगड]] हा सर्व परिसर येथून दिसतो.
 
==गडावर जाण्याच्या वाटा ==
रायरेश्वराला जाण्याचे अनेक मार्ग आहेत. कोणत्याही मार्गाने जायचे झाल्यास [[भोर]] लागतेच.
 
१.[[टिटेधरण]] [[कोर्ले]]बाजूने : पुण्याहून [[भोर]]मार्गे [[आंबवडे]] गाव व तेथून टिटेधरण कोर्लेबाजूने रायरेश्वरावर जाता येते. या मार्गाने गडावर जाण्यास साधारणपणे ३ तास लागतात. वाट काही ठिकाणी अवघड आहे.
 
२.[[भोर]]-[[रायरी]] मार्गे : भोर गावातून रायरी गावासाठी सकाळी अकरा व सायंकाळी बस येते. याच वाटेला सांबरदर्‍याची वाट म्हणून देखील संबोधली जाते. या वाटेने रायरेश्ववर गाठण्यास दोन तास लागतात.
 
३. [[केंजळगड|केंजळगडावरून]] सूणदर्‍याने किंवा श्वानदर्‍याने सुद्धा रायरेश्वरला जाता येते.
 
=बाह्य दुवे==
*[http://mangeshbochare.blogspot.com/2009/08/blog-post_8773.html रायरेश्र्वर](मराठी)
*[http://bhatkanti.blogspot.com/2007/09/bhatkanti-rayareshwar.html रायरेश्र्वर](इंग्रजी)
{{किल्ला
|नाव = '''{{PAGENAME}}'''