"कृ.पं. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख शशिकांत देशपांडे वरुन कृ.पं. देशपांडे ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉ. कृष्णराव पंढरीनाथ ऊर्फ शशिकांत देशपांडे (जन्म : वाडे, खेड तालुका-पुणे जिल्हा, ३ एप्रिल, इ.स. १९४१) हे एक मराठी लेखक आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण वाडे गावात, माध्यमिक राजगुरुनगरला आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात स.प. महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे झाले. ते एम.ए. बी.एड. पीएच.डी. असून त्यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र विद्यालयात ३१ वर्षे अध्यापक म्हणून काम करून, १९९७ मध्ये निवृत्ती घेतली..
 
देशपांडे हे पुणे विद्यार्थी गृहाच्या ’समाचार’ पत्रिकेचे व विद्यालय विशेषांकाचे चार वर्षे आणि पौड रोड ज्येष्ठ नागरिक संघाच्या ’प्रेरणा’ मासिकाचे ३ वर्षे संपादक होते. कोथरूड साहित्य संमेलनाची स्मरणिका काढण्यात त्यांचा सहभाग होता. अनेक संस्थांच्या वक्तृत्वस्पर्धांचे व निबंधस्पर्धांचे ते परीक्षक असत.
 
==कृ.पं. देशपांडे यांचे लेखन==
देशपांडे यांनी इ.स. १९६२ पासून१९६२पासून लिहायला सुरुवात केली. आजवर त्यांनी कथा, कविता, कादंबरी, चरित्र-लेखन, संशोधनात्मक लेखन, शैक्षणिक लेखन आणि कुमार वाङ्‌मय या सर्व प्रकारांत संपादन व लेखन केले आहे. त्यांची १५५हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
 
==कृ.पं. देशपांडे यांची काही पुस्तके==
* अग्निकंकण (हुतात्मा राजगुरू यांच्या जीवनावरील कादंबरी)
* अग्निफुले (सावित्रीबाई फुले-काव्य स्वरूप आणि समीक्षा)
* अग्निशिखा (पौराणिक कादंबरी)
* कथा क्रांतिकारकांच्या (२० भाग)
* क्रांतिचंद्र (चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनावरील कादंबरी)
* मंदोदरी (पौराणिक कादंबरी)
* महानुभावांचे साती ग्रंथ : स्वरूप आणि समीक्षा (पीएच्‌‍डीचा प्रबंध)
* मास महिमा - आश्विन (माहितीपर)
 
==साहित्य पुरस्कार==
* महानुभावांचे साती ग्रंथ : स्वरूप आणि समीक्षा या पीएच्‌‍डीच्या प्रबंधाला मराठी विषयातील १९७९-८० सालच्या सर्वोत्कृष प्रबंधासाठी कै. य.वि. परांजपे, कै.[[न.चिं. केळकर]] आणि डॉ.[[वि.रा. करंदीकर]] असे तीन पुरस्कार
* ’मास महिमा - आश्विन’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट साहित्यनिर्मितीचा पुरस्कार (१९८१-८२)
* साहित्यसेवेबद्दल पुणे मराठी ग्रंथालयाचा वर्धापनदिन पुरस्कार (१९९८)
* ’कथा क्रांतिकारकांच्या’ला [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचा]]‍ [[वि.वि. बोकील]] पुरस्कार आणि पुणे मराठी ग्रंथालयाचा [[ना.के. बेहेरे]] पुरस्कार (२००८)
 
==आदर्श शिक्षक पुरस्कार==
* पुणे महापालिका पुरस्कार (१९८३)
* शिक्षकोत्तम [[आचार्य अत्रे]] पुरस्कार (१९८५)
* अखिल महाराष्ट्रीय जैन संघटना पुरस्कार (१९९१)
* ज.शां. वैद्य पुरस्कृत आदर्श शिक्षक पुरस्कार (१९९१)
* पुणे अनाथ विद्यार्थी गृहाकडून पुरस्कार (१९९२)
* राष्ट्रीय पुरस्कार (१९९२)
 
 
{{DEFAULTSORT:देशपांडे,कृष्णराव पंढरीनाथ}}
 
 
 
[[वर्ग:इ.स. १९४१ मधील जन्म]]
(अपूर्ण)
[[वर्ग:मराठी लेखक]]