"मेघदूत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ९:
==मेघदूताचे अनुवाद==
* [http://www.kavitakosh.org/kk/मेघदूत_/_कालिदास हिंदी गद्य अनुवाद]
* मेघदूत : मराठी समश्लोकी, समछंदी अनुवाद - [[चिंतामणराव देशमुख]]
* मेघदूत (मराठी पद्य अनुवाद) - रा. प. सबनीस, [[कृष्णशास्त्री चिपळूणकर]], डॉ. श्रीखंडे, कात्रे, [[ना.ग. गोरे]], वसंतराव पटवर्धन, [[बा.भ. बोरकर]], [[कुसुमाग्रज]], [[शांता शळके]], [[द.वें. केतकर]], [[अ.ज. विद्वांस]] वगैरे. यांपैकी [[चिंतामणराव देशमुख]], पंडित ग.वि. कात्रे, [[बा.भ. बोरकर]], द.वें. केतकर व अ.ज. विद्वांस या पाच जणांनी मेघदूताच्या मूळ ‘मंदाक्रान्ता’ या वृत्तातच मराठीतून काव्यानुवाद केला आहे.. बाकीच्यांनी निरनिराळ्या जातिवृत्तांतून जसे- साफी, समुदितमदता किंवा मुक्तछंदामध्ये अनुवाद केले आहेत.

==समश्लोकी अनुवादाचे नमुने==

मूळ संस्कृत श्लोक (पूर्व मेघ-श्लोक ७वा, वृत्त -मंदाक्रांन्ता) पुढीलप्रमाणे -

संतप्तानां त्वमसि शरणं तत्पयोद प्रियाया:।।

संदेशं मे हर धनपतिक्रोधविश्लेशितस्य।।

गन्तव्या ते वसतिरलका नाम यक्षेश्वराणां।।

बाह्योद्यानस्थितहरशिरश्चंद्रिकाधौतहर्म्या।।

गद्यार्थ- हे मेघा, संतप्तांचा, व्यथितांचा तू निवारा आहेस. स्वामींच्या शापामुळे मी माझ्या सखीचा विरह फार कष्टाने सहन करतो आहे. तेव्हा माझा निरोप तेवढा माझ्या प्रिय सखीला पोहोचवण्याची विनंती तुला करतो आहे. तुला यक्षांच्या अलकानगरीमध्ये जायचे आहे. तिच्यामधले महाल, वाडे, बाहेरच्या उद्यानात असलेल्या शंभूशीर्षांवरील चंद्राच्या प्रकाशाने उजळून निघाले आहेत.

मराठी काव्यानुवाद- (वृत्त-मंदाक्रान्ता) -

१). संतप्तांचा अससि जलदा आसरा तूं, निरोप

कांतेला दे, विरह घडवी आमुचा स्वामि-कोप

यक्षेशाचें नगर अलका तेथ जा, सौध जेथ

बाह्योद्यानीं वसत हर तच्‍चंद्रिका द्योतवीत।।

([[चिंतामणराव देशमुख]])

२). तप्तांची तू कणव जलदा! प्रीती संदेश देई

स्वामीक्रोधें सखि विलग मी पोळतो येथ पाही

यक्षेशाच्या नगर अलके जा जिथें हर्म्यकेन्द्रे

बाह्य़ोद्यानी हर उजळूनी क्षालितो भालचंद्रे।।

([[बा.भ. बोरकर]])

३) संतप्तांना निरविशी xx क्षेम सांगे प्रियेस

दूरप्रान्ती विरहि पडलो क्रुद्ध होता धनेश

यक्षेशाचि नगरी अलका गांठली पाहिजेस

पाही तेथे धवलित उमानाथ चंद्रे निवास।।

(पंडित ग.नि. कात्रे)

४). निवारा तू जलद व्यथितां ने निरोप प्रियाते

स्वामीशापे सखिविरह मी साहतो फार कष्टे

जायाचे तूं नगरि अलका धाम यक्षेश्वरांचे

बाह्योद्यानी धवलि इमले चंद्रमाथी शिवाचे।।

(अ.ज. विद्वांस)

५) बाह्योद्यानी शिव-शशिकरें दीप्त ते हर्म्य जेथे

यक्षेशाची वसति अलका, जायचे जाण तेथे

तप्तां देशी उपशम तसा तू मदीयें निरोपे

जा मत्कान्तेप्रति विघटनें दूर मी स्वामिकोपे।।

(द. वें. केतकर)

==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मेघदूत" पासून हुडकले