"लीलाधर हेगडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
मराठी शाहीर '''लीलाधर हेगडे''' (जन्म : ९ नोव्हेंबर, १९२७)हे एक मराठी साहित्यिक आहेत. ते [[साने गुरुजी|साने गुरुजींच्या]] ’धडपडणार्‍या मुलां’पैकी एक होते. ते राष्ट्र सेवा दल या समाजवादी स्वयंसेवक संघटनेचे पूर्ण वेळ सेवक झाले. त्यांनी १९४८ ते १९८० या काळात राष्ट्र सेवा दल कलापथकाची धुरा वाहिली. [[समाजवादी पक्ष|समाजवादी पक्षात]] असलेले हेगडे, हे [[राष्ट्र सेवा दल|राष्ट्र सेवा दलाच्या]] कलापथकात [[सुधा वर्दे]], [[वसंत बापट]], आदींबरोबर लोकजागृतीसाठी गावोगाव प्रवास करत.
 
हेगडे यांचा जन्म [[ठाणे]] जिल्ह्यातील एका खेड्यात झाला. त्यांनी इ.स. १९४२च्या चले जाव आंदोलनात सहभाग घेतला; तसेच [[साने गुरुजी|साने गुरुजींच्या]] [[पंढरपूर]] मंदिर सत्याग्रहातही ते सामील झाले. [[मुंबई]]तल्या चुनाभट्टी उपनगरातील [[साने गुरुजी]] आरोग्य मंदिराचे काम ते इ.स. १९७०च्या आधीपासून सांभाळत आहेत.
 
त्यांनी गायलेली ''उत्तुंग आमुची उत्तर सीमा'', ''माझे राष्ट्र महान'' ही गीते प्रसिद्ध झाली. मुलांसाठी हेगडे यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.
 
‘रामनगरी’त [[राम नगरकर|राम नगरकरांनी]] हेगडे यांची शिस्तप्रियता आणि नियोजनाचे मार्मिक वर्णन केले आहे. आपल्या कृतीतून दुसर्‍याचा फायदा कसा होईल, समाज कसा सुधारेल याचाच विचार लीलाधर करीत असतात. बालसाहित्य लेखनामागेही संस्कारशील मने घडविण्याचाच संकल्प त्यांनी केला
 
==लीलाधर हेगडे यांची मुलांना आवडलेली काही पुस्तके==
* अंधारातून प्रकाशाकडे (आमटे कुटुंबीयांची कहाणी)
* कावळे
* गुंतागुंत
* जादूची पेटी
* तुफान हत्ती आणि वनराणी सिंहीण
* पाचूचे बेट
* बैलांचा गोंधळ
* मनी हरवली, मनी सापडली
* वेरूळचे वैभव
* हणमू आणि इतर गोष्टी
 
==लीलाधर हेगडे यांनी मिळालेले पुरस्कार==
* हेगडे यांच्या ‘गुंतागुंत’, ‘पाचूचे बेट’, ‘मनी हरवली मनी सापडली’, ‘हणमू’, ‘वेरुळचे‘वेरूळचे वैभव’ इत्यादी पुस्तकांना शासकीय पुरस्कार मिळाले आहेत.
* साहित्य अकादमीचा २०१५चा राष्ट्रीय बालसाहित्य सन्मान
* महाराष्ट्र फौंडेशन, न्यूयॉर्क आणि केशव गोरे स्मारक, गोरेगाव, मुंबई यांच्यातर्फे आदर्श कार्यकर्ता म्हणून रु. ५०.०००ेचा पुरस्कार
* महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने फेब्रुवारी २०११ मध्ये रु. ५०,०००ची गौरववृत्ती प्रदान करून त्यांचा सन्मान केला.
 
{{DEFAULTSORT:हेगडे, लीलाधर}}