"जंगली महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ४:
==बालपण==
जंगली शहा यांचे जन्मगाव [[सोलापूर]] जवळील होनमुर्गी हे लहानसे खेडे.. हिंदू, इस्लाम आणि वीरशैव अशा वेगवेगळ्या धर्माचे लोक या गावात शतकानुशतके गुण्यागोविंदाने नांदत आहेत. होनमुर्गी गावाचे कुलदैवत बसवेश्वर हे आहे. तिथे जसे बसवेश्वराचे मंदिर आहे त्याचप्रमाणे मेहबूब सुसानी या पीरांचा दर्गाही आहे. जंगलीशहा हे बालपणापासूनच अत्यंत तल्लख बुद्धीचे होते. मराठी, कन्नड, उर्दू, संस्कृत आणि फार्सी या भाषा आणि मल्लविद्या यांचा त्यांनी
==साधना==
वेदान्त, योगशास्त्र, मंत्रशास्त्र, राजयोग, हठयोग यांबरोबर त्यांनी हिमालय आणि आळंदी येथे नाथसंप्रदायी योग्यांबरोबर जंगली महाराजांनी साधनाही केल्या होत्या, असे म्हणतात देशाटन करताना त्यांनी लोकांना त्यांच्या धर्माप्रमाणे उपदेश करणे, दीनदुबळ्यांच्या दुःखाचे निवारण करणे, तेथील सत्पुरुषांच्या समाध्या, तेथील देवस्थाने, मंदिरे यांचा जीर्णोद्धार करणे वगैरे कामे सुरू केली. जंगली महाराज नरसोबाच्या वाडीला असताना गतभर्तृका रखमाबाईं गाडगीळांनी त्यांचा अनुग्रह घेतला. त्यांना अष्टांगयोगात प्रवीण करून महाराजांनी रखमाबाईंना आपला उत्तराधिकारी नेमले.
==[[पठ्ठे बापूराव]] यांना सदुपदेश==
[[कर्हाड]]जवळच्या रेठरे बुद्रुक येथील [[श्रीधरपंत कुलकर्णी]] ऊर्फ पठ्ठे बापूराव]] यांना जंगली महाराजांनी १८६५मध्ये अनुग्ररह दिला. महाराजांच्या सहवासात आल्यावर पठ्ठे बापूराव यांचे काव्य शृंगाराकडून भक्तिमार्गाकडे वळले.
==समाजकार्य==
जंगली महाराज यांनी इ.स. १९६८ साली पुण्याला येण्यापूर्वी श्र्रे क्षेत्र [[देहू]] येथे [[तुकाराम]] महाराजांच्या घरापासून ते त्यांच्या वैकंठगमनाच्या स्थळापर्यंतचा रस्ता बांधवून घेतला आणि कडेला झाडेही लावली. तेथ्च भक्तांसाठी एक धर्मशाळा व पुंडलिकाचे मंदिर बांधले. आजही दर वर्षी [[तुकाराम]] बीजेच्या दिवशी जंगली महाराज्भजनी मंडळ पुण्याहून भक्त पुंडलिकाची पालखी घेऊन देहूला त्या मंदिराकडे जाते.
जंगली महाराजांना पुण्यात तुळसीबाई इंगळीकर नावाच्या बाई शिष्या म्हणून लाभल्या. तुळसाआक्कांनी पुण्यात शिवाजीनगर येथे रोकडोबामंदिरासमोर श्रीरामाचे देऊळ बांधले. महाराजांचे पुण्यातल्या भांबुर्डा गावठाण्यातील रोकडोबा मारुती मंदिरात वास्तव्य असे. रोकडोबाचे त्या काळचे स्वरूप भैरवाचे असल्याने त्या मंदिरात पशू बळी देणे, विंचू-दंश झाल्यास देवासमोर वाद्यांचा गजर करून साकडे घालणे, नवसपूर्तीसाठी माणसाला बागाडाला अडकवणे वगैरे अघोरी प्रकार चालत. याबरोबर रेड्यांच्या झुंजी आणि तमाशेही चालत. जंगली महाराजांनी अनिष्ट गोष्टींना पायबंद घालताना केलेला पहिला बदल म्हणजे रोकडोबाचे भैरव हे स्वरूप बदलून त्याला मारुतीचे रूप दिले.बागाड या अघोरी प्रकाराऐवजी महाराजांनी गळ्यात वीणा घेऊन देवापुढे अखंड हरिनामाचा पहारा सुरू केला. रेड्यांच्या झुंजींऐवजी जंगली महाराजांनी मल्ल्यांच्या कुस्त्या सुरू केल्या. मंदिरात आजही ’पहारा’ होतोआणि जवळपासच्या तालमींमध्ये बलोपासना चालते.
जंगलीमहाराजांनी १८८१ साली स्थापन केलेले सद्गुरू जंगलीमहाराज भजनी मंडळ आजही कार्यरत आहे.
==कुस्तीसाठी कार्य==
Line १० ⟶ २५:
==निर्वाण==
इ.स. १८९० च्या प्रारंभी महाराजांची प्रकृती खालावत चालली. त्या काळातही ते योगसाधना करीत असत. आपल्या आयुष्याच्या सायंकाळीची चाहूल लागली असल्यानेच जणू भांबुरड्याच्या टेकडीवर आपल्या समाधीची/कबरीची जागा त्यांनी निश्चित करून ठेवली होती. ४ एप्रिल १८९० रोजी महाराजांनी आपली इहलोकींची यात्रा संपविली. महाराजांच्या पश्चात रखमाबाईंनी त्यांचा संप्रदाय आयुष्याच्या अखेरीपर्यंत चालवला. फेब्रुवारी १९०२मध्ये माघ वद्य षष्ठीला रखमाबाई ऊर्फ आईसाहेब निर्वतल्या. पुण्यात जंगली महाराजांच्या समाधीजवळच त्यांची आणि तुळसाआक्कांची समाधी आहे..
==संदर्भ==
|