"अशोक पाटोळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अशोक पाटोळे (जन्म: गिरगाव (मुंबई), ५ जून, १९४८; मृत्यू : मुंबई, १२ मे. २...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
अशोक पाटोळे (जन्म: गिरगाव (मुंबई), ५ जून, १९४८; मृत्यू : मुंबई, १२ मे. २०१५) हे एक मराठी कथाकार आणि नाटककार होते.
 
पाटोळे यांचे शालेय शिक्षण गिरगावातील विल्सन हायस्कूल येथे झाले. त्यांनी लिहिलेली पहिली कथा 'नवाकाळ' या दैनिकात प्रकाशित झाली होती. पुढे 'श्री दीपलक्ष्मी', साप्ताहिक मार्मिक' आदी नियतकालिकांमधून त्यांनी लिहिलेल्या विनोदी कथा प्रकाशित झाल्या होत्या. पाटोळे ह्यांनी दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचेही लेखन केले होते. लहानपणापासूनच लिखाणाची आवड असलेले पाटोळे यांनी पहिल्यांदा १९७१ मध्ये 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' या एकांकिकेचे लेखन केले होते. यानंतर त्यांनी विनोदी व ह्रदयस्पर्शी अशा दोन्ही प्रकारच्या नाटकांचे लेखन करत नाट्यक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
 
पाटोळे यांनी लिहिलेली २० नाटके व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. 'झोपा आता गुपचूप' हे त्यांचे पहिले नाटक. 'मुंबई पोर्ट ट्र्स्ट'च्या 'एकटा जीव सदाशिव' या नाटकात त्यांनी विनोदी नायकाची भूमिका केली होती.
 
चित्रकला, वक्तृत्व, गीतगायन व अभिनय यांचीही पाटोळ्यांना आवड होती.
 
रूपेश पाटोळे हे त्यांच्या मुलाचे नाव.
 
==अशोक पाटोळे यांनी लिहिलेली नाटके==
Line ११ ⟶ १५:
* एक चावट संध्याकाळ
* चारचौघांच्या साक्षीने
* जाऊबाई जोरात
* झोपा आता गुपचूप
* तांदूळ निवडता निवडता
Line १६ ⟶ २१:
* दुर्गाबाई जरा जपून
* देखणी बायको दुसर्‍याची
 
* प्रेम म्हणजे लव्ह असतं
* बा रिटायर थाय छे (गुजराथी)
Line २३ ⟶ २७:
* मी माझ्या मुलाचा
* श्यामची मम्मी
* प्रा. वाल्मिकी रामायण
* सातव्या मुलीची सातवी गोष्ट
* हीच तर प्रेमाची गंमत आहे
 
Line ३१ ⟶ ३७:
* पाटोळ्यांच्या पाचोळ्या
 
==अशोक पाटोळे यांनी लिहिलेल्या मराठी दूरचित्रवाणी मालिका==
* अधांतर
* अध्यात ना मध्यात
* झोपी गेलेला जागा झाला
* हद्दपार (मराठी)
* ह्यांचा हसविण्याचा धंदा
 
==अशोक पाटोळे यांनी लिहिलेल्या हिंदी दूरचित्रवाणी मालिका==
* चुनौती (हिंदी)
* श्रीमान श्रीमती (हिंदी)
* हसरतें
 
 
==अशोक पाटोळे यांच्या पटकथा, संवाद असलेले चित्रपट==
* चौकट राजा
* मझीमाझा पती करोडपती
 
==आत्मचरित्र==
एक जन्म पुरला नाही