"ग.कृ. गर्दे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
डॉ. गणेश
वैद्यकीय विषयांना वाहिलेल्या ग्रंथांखेरीज ग.कृ. गर्दे यांनी इतरही काही संस्कृत ग्रंथांचे मराठी भाषांतर केले. सटीप ईशगुणादर्शः (१९१९), सार्थ व समश्लोकी शिवमहिम्न व उपमन्युकृत शिवस्तोत्र (१९०५) ही त्यांची संस्कृतवरून मराठीत पद्यरूपात आणलेली काव्ये होत. ह्या काव्यांवरून गर्दे यांची काव्यशक्ती, भाषाप्रभुत्व व निर्दोष छंदरचना यांचा प्रत्यय येतो. विष्णुसहस्रनामातील प्रत्येक नावावर एक याप्रमाणे त्यांनी स्वतंत्र श्लोकही रचले होते.
साहित्य आणि संस्कृतीविषयी आवड असल्याने डॉ. ग.कृ. गर्दे यांना पुण्यात आल्यावर [[लोकमान्य टिळक]] यांच्याशी संबंध आला. त्यांच्या मैत्रीमुळे गर्दे यांनी राजकारण, साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम यांत सह्भाग घ्यायला सुरुवात केली. ते टिळकांनी सुरू केलेल्या ’केसरी’ या वर्तमानपत्राचे सुरुवातीच्या संस्थापक पुरस्कर्त्यांपैकी एक होते. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवात ते व्याख्याने देत. टिळकांचे ते वैद्यकीय सल्लागार होते.
डॉ. गणेश कृष्णाजी गर्दे यांच्या चौफेर व्यासंगामुळे त्यांना [[पुणे]] येथे १९०९ साली भरलेल्या ५व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|मराठी नाट्यसंमेलनाचा]] अध्यक्ष होण्याचा मान मिळाला.
{{DEFAULTSORT:गर्दे, गणेश कृष्णाजी}}▼
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने|अध्यक्ष]]
[[वर्ग:इ.स. १८८५ मधील जन्म]]
|