"पटवर्धनी पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: '''केरोपंती अथवा पटवर्धनी पंचांग''' हे दृक्प्रत्यय देणारे पंचांग... |
No edit summary |
||
ओळ २:
या केरोपंती पंचांगाचे गणित प्रथम काही वर्षे स्वतः केरोपंतांनी केले असावे; परंतु पुढे त्यांच्या देखरेखीखाली हे गणित वसई येथील आबा जोशी-मोघे हे करीत असत. शेवटी शेवटी केरोपंतांचे वंशज [[नी.वि. छत्रे|नीलकंठ विनायक छत्रे]] यांच्या देखरेखीखाली हे पंचांग बनत असे.
या पंचांगास आधी नवीन पंचाग हे नाव होते व त्याच्या गणिताचा खर्च आबासाहेब पटवर्धन करीत. म्हणून शके १७९९ पासून पटवर्धनांच्या स्मरणार्थ ह्या पंचांगास पटवर्धनी पंचांग असे नांव ठेवण्यात आले. आबासाहेब यांस खगोलशास्त्राची आवड असल्यामुळे त्यांनी स्वखर्चाने आकाशाचा वेध घेण्याचे साहित्य विकत घेतले होते.
शके १७९१ पासून १८११ पर्यंत [[रत्नागिरी]] येथील जगन्मित्र छापखान्याचे मालक जनार्दन हरि आठले यांना केरोपंती पंचांगाचा अभिमान असल्यामुळे, ते स्वतःच्या खर्चाने ते पंचांग छापवीत. शके १८१२ पासून पुणे येथील चित्रशाळेचे मालक वासूकाका जोशी पंचांग छापू लागले. आठले व जोशी यांनी छापण्याचे मनावर घेतले नसते तर ते पंचांग कधीच बंद पडले असते.
त्या काळच्या इतर पंचांगांहून केरोपंती पंचांग भिन्न होते. या पंचांगाच्या गणितासाठी रेवती नक्षत्रातला मुख्य तारा शके ४९६ मध्ये संपाती होता असे मानले आहे. म्हणून त्या वर्षी अयनांश शून्य मानून गणित केले जात असे.
[[वर्ग:हिंदू पंचांग]]
|