"एकनाथ पांडुरंग रेंदाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
===कवितासंग्रह===
पुढे कोल्हापुरातील जगद्गुरू मठातर्फे 'धर्मविचार' हे मासिक सुरू झाले. रेंदाळकर त्याचे सहसंपादक झाले. हे काम एकीकडे सुरू असताना रेंदाळकरांचे कवितालेखनही जोमात होते. याच काळात 'मंदारमजरी' या शीर्षकाने १९१० रोजी रेंदाळकरांनी निवडक कवितांचा संग्रह प्रसिद्ध झाला. 'सुधारक', 'विविधज्ञानविस्तार', 'मनोरंजन', 'प्रगती' इत्यादी त्या वेळच्या नियतकालिकांत या पुस्तकाची प्रशंसापर परीक्षणे प्रसिद्ध झाली. 'मंदारमंजरी'मुळे महाराष्ट्रातील मान्यवर कवींमध्ये त्यांची गणना होऊ लागली.
 
रेंदाळकरांचे [[सांगली]]तील वास्तव्य वामन जनार्दन कुंटे यांच्या वाड्यात होते. पुढे कुंटे त्यांचे गाढ स्नेही झाले. रेंदाळकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कवितांचे दोन खंड कुंटे यांनी प्रसिद्ध केले. कुंटे यांच्यामुळेच रेंदाळकरांची कविता महाराष्ट्रापुढे आली.
 
==संपादकीय कारकीर्द==
रेंदाळकर सहसंपादक असलेल्या 'धर्मविचार'चे प्रकाशन १९१२ मध्ये एका वर्षापुरते स्थगित झाले. त्यानंतर रेंदाळकर मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या 'मासिक मनोरंजन'मध्ये साहाय्यक संपादक म्हणूम रुजू झाले. तेथे आधीच पदावर असलेल्या विठ्ठल सीताराम ऊर्फ [[वि.सी. गुर्जर]] यांच्याबरोबरच 'मनोरंजन'वर रेंदाळकरांचेही नाव झळकू लागले. गुर्जर यांचे ते साहाय्यक होते.'मनोरंजन'शिवाय 'करमणूक', विविधज्ञानविस्तार' येथेही निरनिराळ्या काळी रेंदाळकर संपादक म्हणून काम करत होते.
 
==कौटुंबिक माहिती==
रेंदाळकरांचे लग्न वयाच्या तेविसाव्या-चोविसाव्या वर्षी झाले. रेंदाळकरांच्या पत्नींना पुढे हिस्टेरिया जडला. १९१९ मध्ये पत्नीचे निधन झाले. रेंदाळकर पती-पत्नीला दोन मुली आणि एक मुलगा होता.
 
==रेंदाळकरांच्या प्रसिद्ध कविता==
१. अजुनी चालतोचि वाट. ही कविता [http://balbharatikavita.blogspot.in/search/label/%E0%A4%8F.%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82.%20%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0%20%28%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AE%E0%A5%AD%20-%20%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A8%E0%A5%A6%20%29 बालभारती] या शालेय अभ्यासक्रमातील पुस्तकात आहे.
 
==संदर्भ==