"भानुमती कंस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
भानुमती कंस या एक मराठी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्यांनी गायलेली अनेक मराठी भावगीते अजरामर झाली.
भानुमती कंस या मुंबईतील सेंट झेवियर कॉलेजातून द्विपदवीधर झाल्या होत्या आणि बी.आर. देवधरांकडे संगीत शिकत होत्या. दिसायला त्या अत्यंत रूपवान तर होत्याच, पण त्या एक टेनिस खेळाडूही होत्या. देवधरांच्या वर्गात असताना भानुमतींना तेथे संगीत शिकायला येत असलेले [[कुमार गंधर्व]] भेटले, आणि त्या दोघांनी २४ एप्रिल, १९४७ रोजी प्रेमविवाह केला. लग्नानंतर पाचच महिन्यांनी [[कुमार गंधर्व] यांना क्षयाची बाधा असल्याचे निदर्शनाला आले. शस्त्रक्रिया करून त्यांचे एक फुफ्फुस काढावे लागले आणि कोरड्या हवेसाठी कुमार आणि भानुमती देवासला आले. उदरनिर्वाहासाठी भानुमती कंस या देवासच्याच एका शाळेत मुख्याध्यापिका म्हणून काम करू लागल्या. संसाराची सारी जबाबदारी त्यांच्यावरच पडली.
भानुमती कंस यांनी आपल्या संगीताचे शिक्षण [[कुमार गंधर्व]] यांच्या मार्गदर्शनाखाली चालूच ठेवले.
कुमारांच्या दुखण्यात पत्नी भानुमती यांनी त्यांची सेवाशुश्रूषा केली. भानुमतींच्या मदतीने कुमार आजारातून बरे झाले आणि १९५३मध्ये आजारानंतरची त्यांची पहिली मैफल रंगली.
मात्र भानुमती कंस यांना क्षयाची बाधा झाली आणि त्यांचे १९६१मध्ये दुसऱ्या बाळंतपणात निधन झाले. त्यापूर्वी त्यांना एक मुलगा झालेला होता. तो पुढे गायक [[मुकुल शिवपुत्र]] म्हणून प्रसिद्ध झाला.
भानुमतीच्या मृुत्यूनंतर कुमार गंधर्वांनी वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी विवाह केला.
==भानुमती कंस यांनी गायलेली प्रसिद्ध भावगीते==
|