"गो.नी. दांडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ४७:
त्यांच्या [[पडघवली]] आणि [[शितू]] ह्या कादंबर्या कोकणाचे नयनरम्य चित्र डोळ्यासमोर उभे करतात. त्यांचे [[दुर्गभ्रमणगाथा]] हे महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे.
१ जून १९९८ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. त्यांची मुलगी [[वीणा देव]] (डॉ.वीणा विजय देव)] ह्या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांची नात मधुरा देव हीसुद्धा ललित लेखन करते आणि दुसरी नात मृणाल देव-कुलकर्णी ही विख्यात अभिनेत्री आहे.
==कादंबरी अभिवाचन==
वर्षातून एकदा गो.नी. दांडेकरांच्या कादंबर्यांच्या वाचनाचा सार्वजनिक कार्यक्रम होतो. या उपक्रमाची सुरुवात १९७५ मध्ये प्रत्यक्ष गोनीदांनी केली. संत ज्ञानेश्वरांच्या सातव्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी सर्वप्रथम 'मोगरा फुलला' या कादंबरीचे अभिवाचन केले होते. यामध्ये त्यांची कन्या डॉ. वीणा देव, जावई डॉ. विजय देव हे सहभागी झाले होते. कादंबरीतील कथानाट्य वाचनातून लोकांपुढे उभे करण्याच्या या अभिनव प्रयोगाचे त्या वेळी सर्वत्र स्वागत झाले होते
यानंतर गोनीदांच्या कुटुंबीयांनी या अभिवाचनाची एक चळवळच उभी केली. 'मोगरा फुलला'च्या पाठोपाठ मग शितू, पडघवली, मृण्मयी, पवनाकाठचा धोंडी, वाघरू, जैत रे जैत, देवकीनंदन गोपाला, हे तो श्रींची इच्छा अशा एकेक कलाकृती या अभिवाचन संस्कृतीतून वाचकांना भेटू लागल्या. गोनीदा हयात असताना सुरू झालेला हा उपक्रम त्यांच्या पश्चातही या कुटुंबाने अखंडपणे सुरू ठेवला. त्यांच्या या उपक्रमात पुढे देव कुटुंबीयांचे जावई रुचिर कुलकर्णी हेदेखील सहभागी झाले.
अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे आयोजित केलेला या कादंबरी अभिवाचनाचा साडेसहाशेवा प्रयोग १८ फेब्रुवारी २०१५ रोजी पुण्यात ’निवारा’ सभागृहात झाला.
.
===गो.नी.दां.चे दुर्गप्रेम ===
|