"संगीता बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २:
आयुर्वेदशास्त्राच्या पदवीधर असलेल्या संगीताबाईंनी वाचनाच्या वेडापायी मराठी साहित्यात एम.ए. केले. त्यामुळे त्यांना मध्ययुगीन वाङ्मयापासून ते, निरनिराळ्या साहित्य्कृतींचा अभ्यास करता आला; कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या त्यांनी साहित्याच्या परीक्षा दिल्या आहेत त्या निमित्ताने त्यांना संत साहित्याचाही अभ्यास करता आला. त्यांनी रचलेल्या बालकवितांवर आधारित ’नाच रे मोरा’ ’गंमत झाली भारी’ आणि या रे या सारे गाऊ या’ या नावांच्या कार्यक्रमांचे अनेक ठिकाणी सादरीकरण झाले आहे. मुलांसाठी संगीता बर्वे यांनी त्यांच्या सुट्टीमध्ये ’आकाश कवितेचे’ या नावाचे शिबिर भरवले होते, त्यात मुलांसाठी बालकवितांच्ची १०० पुस्तके ठेवली होती. या शिबिरात मुलांनी कविता वाचल्या, म्हटल्या आणि रचल्याही.
त्यांचे नाव बालकवितेबाबत झाले असले, तरी त्यांच्या सामाजिक वेदनांना त्यांनी आपल्या कवितेतून वाट करून दिली आहे. डॉक्टर म्हणून झोपडपट्टीत दवाखाना चालविताना उपचारासाठी येणार्या स्त्रियांचे वास्तव दर्शन त्यांना झाले आणि त्यांचे शब्द कवितेतून प्रकटले आहेत.
मावळ तालुक्यातील मारुंजी गावी १५-१६ फेब्रुवारी २०१५ या काळात होणार्या २६व्या [[बालकुमार साहित्य संमेलन]]ाच्या त्या नियोजित अध्यक्षा आहेत.
Line १९ ⟶ २१:
* मृगतृष्णा (१९९८)
==डी.व्ही.डी.==
* संगीता बर्वे यांच्या गंमत झाली भारी' आणि ’सारे सारे गाऊ' या दोन गाण्यांच्या डीव्हीडी फाउंटन म्युझिकने बाजारात आणल्या आहेत.
.
|