"सतीश आळेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ५७:
== जीवन ==
आळेकरांचा जन्म [[जानेवारी ३०]], [[इ.स. १९४९]] रोजी [[दिल्ली|दिल्लीत]] झाला. त्यांची आई म्हणजे [[काकासाहेब गाडगीळ|न.वि. गाडगीळ]] यांची कन्या. आळेकरांचा वाडा पुण्यातील शनिवार पेठेत काकासाहेब गाडगीळांच्या वाड्यापासून हाकेच्या अंतरावर होता. आळेकरांचे शिक्षण [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे|पुण्यात]] झाले. [[इ.स. १९७२]] साली ते [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातून]] बायोकेमिस्ट्री हा विषय घेऊन एम.एस्सी. झाले.
शाळेत सर्वसाधारण विद्यार्थी असलेले सतीश आळेकर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवू शकले नाहीत, परंतु त्याछे मामा [[काकासाहेब गाडगीळ]] यांच्यामुळे काँग्रेस, [[साप्ताहिक साधना|साधना]] कार्यालयाजवळ घर असल्याने [[राष्ट्र सेवा दल]] आणि शेजारेच मोतीबाग असल्याने [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|संघविचार]] असे सर्वसमावेशक संस्कार त्यांच्यावर झाले.
ओळ ६८:
'मेमेरी' ही पहिली एकांकिका आळेकरांनी 'पीडीए'च्या शशिकांत कुलकर्णी यांना वाचून दाखविली. त्यांनी ती 'सत्यकथे'ला पाठली. संपादक [[राम पटवर्धन]] यांनी ती प्रसिद्ध तर, केलीच. पण, मानधन म्हणून १५ रुपयांचा धनादेशही पाठविला. 'झुलता पूल' एकांकिकेबाबत त्यांनी आळेकरांना सुधारणा सुचविल्या. त्या आळेकरांनी प्रयोगाच्या वेळी अमलात आणल्या. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पारितोषिक मिळाल्यानंतर पटवर्धन यांनी ही एकांकिका सत्यकथेमध्ये प्रसिद्ध केली होती.
'घाशीराम कोतवाल ' या नाटकासाठी डॉ. [[जब्बार पटेल]] यांच्या बरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून सतीश आळेकरांनी आपली नाट्यव्यवसायातील कारकीर्दीची खर्या अर्थाने सुरुवात केली. थिएटर अॅकॅडमी या नाट्यसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. याच संस्थेने रंगमंचावर आणलेल्या 'मिकीमाऊस आणि मेमसाब' , 'महापूर' , 'महानिर्वाण' , 'बेगम बर्वे' या नाटकांचे आळेकर हे लेखक होते. १९७२ पासून नाट्यलेखन करताना त्यांनी ब्लॅक कॉमेडीचा आणि संगीत नाटकांचा आधार घेतला. त्यांची 'महापूर', 'महानिर्वाण' आदी नाटके आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आणि त्या नाटकांचा विविध भाषांमध्ये अनुवादही झाला. जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या नाटकांमध्ये या नाटकांचा समावेश केला जातो. या दोन्ही नाटकांवर मराठी आणि इंग्रजीमध्ये स्वतंत्र समीक्षाग्रंथांचीही निर्मिती झाली आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील विद्यार्थ्यांना नाट्यप्रशिक्षित करण्याचे महत्त्वाचे काम ललित कला केंद्राच्या संचालकपदाच्या माध्यमातून केले. कै. पंडित [[सत्यदेव दुबे]] यांच्यासारख्या रंगभूमीवरील महत्त्वाच्या व्यक्तींशी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांचा संवाद सतीश आळेकर यांच्यामुळेच घडू शकला.
==विशेष==
आळेकरांचे नाव नाटककार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार यांच्या जोडीने घेतले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाटक अनुवाद प्रकल्पासाठी त्यांनी काम केले आहे. प्लेराइटस डेव्हलपमेंट स्कीम आणि रिजनल थिएटर ग्रुप डेव्हलपमेंट या प्रकल्पासाठी त्यांना फोर्ड फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. अमेरिका, इंग्लंड, ग्रीस, जर्मनी आदी अनेक देशांत त्यांनी रंगभूमीविषयक अध्यापन, कार्यशाळा आणि संशोधन प्रकल्पांवर काम केले आहे. पुण्याच्या ललित कला केंद्राचे ते दीर्घकाळ संचालकही होते.
जानेवारी २०१५मध्ये, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे ’नाटककार सतीश आळेकर’ या विषयावर दोन दिवसांचे राष्ट्रीय चर्चासत्र झाले होते. त्याप्रसंगी सतीश आळेकर यांचा मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू [[नागनाथ कोत्तापल्ले]] आणि नाटककार [[दत्ता भगत]] यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.
==चित्रपट/दूरदर्शन मालिका/डॉक्युमेन्टरी==
रंगभूमीप्रमाणेच 'जैत रे जैत' चित्रपटाची पटकथा, 'देखो मगर प्यार से' ही दूरदर्शन मालिका, 'कथा दोन गणपतरावांची' या चित्रपटाचे संवादही आळेकरांनी लिहिले आहेत. अतुल पेठे यांनी 'नाटककार सतीश आळेकर' ही फिल्म निर्माण केली आहे.
== सतीश आळेकर यांनी लिहिलेली नाटके ==
{| class="wikitable sortable"
|-
Line १३८ ⟶ १४४:
* एनसीपीएच्या ‘प्रतिबिंब’ नाट्यमहोत्सवात करण्यात आलेला विशेष सन्मान (जुलै २०१२)
* अखिल भारतीय नाट्य परिषदेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ (जून २०१२)
* संगीत नाटक अकादमी सन्मान
* फुलब्राइट शिष्यवृत्ती
* नांदीकार सन्मान
* एशियन कल्चरल कौन्सिल न्यूयॉर्कचा सन्मान, वगैरे.
==संदर्भ आणि नोंदी==
|