"सतीश आळेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६५:
==कारकीर्द==
फर्ग्युसनच्या गणेशोत्सवातील बबन प्रभू यांच्या दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या गंमत-नाटकात दिनू ही भूमिका आळेकरांनी केली असली तरी, सतीश आळेकरांची दिग्दर्शक व अभिनेता म्हणून खरी कारकीर्द तेंडुलकरांच्या नाटकांपासून सुरू झाली. ’ओळख', 'काळोख' या तेंडुलकरांच्या एकांकिकांत त्यांनी अभिनय केला होता. पुढे भालबा केळकरांनी स्थापन केलेल्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोशिएशनमध्ये आळेकर दाखल झाले आणि घाशीराम कोतवालचे सहदिग्दर्शन त्यांनी केले.
 
'मेमेरी' ही पहिली एकांकिका आळेकरांनी 'पीडीए'च्या शशिकांत कुलकर्णी यांना वाचून दाखविली. त्यांनी ती 'सत्यकथे'ला पाठली. संपादक [[राम पटवर्धन]] यांनी ती प्रसिद्ध तर, केलीच. पण, मानधन म्हणून १५ रुपयांचा धनादेशही पाठविला. 'झुलता पूल' एकांकिकेबाबत त्यांनी आळेकरांना सुधारणा सुचविल्या. त्या आळेकरांनी प्रयोगाच्या वेळी अमलात आणल्या. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पारितोषिक मिळाल्यानंतर पटवर्धन यांनी ही एकांकिका सत्यकथेमध्ये प्रसिद्ध केली होती.
 
'घाशीराम कोतवाल ' या नाटकासाठी डॉ. [[जब्बार पटेल]] यांच्या बरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून सतीश आळेकरांनी आपली नाट्यव्यवसायातील कारकीर्दीची खर्‍या अर्थाने सुरुवात केली. थिएटर अॅकॅडमी या नाट्यसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. याच संस्थेने रंगमंचावर आणलेल्या 'मिकीमाऊस आणि मेमसाब' , 'महापूर' , 'महानिर्वाण' , 'बेगम बर्वे' या नाटकांचे आळेकर हे लेखक होते. १९७२ पासून नाट्यलेखन करताना त्यांनी ब्लॅक कॉमेडीचा आणि संगीत नाटकांचा आधार घेतला. त्यांची 'महापूर', 'महानिर्वाण' आदी नाटके आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आणि त्या नाटकांचा विविध भाषांमध्ये अनुवादही झाला. त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील विद्यार्थ्यांना नाट्यप्रशिक्षित करण्याचे महत्त्वाचे काम ललित कला केंद्राच्या संचालकपदाच्या माध्यमातून केले. कै. पंडित [[सत्यदेव दुबे]] यांच्यासारख्या रंगभूमीवरील महत्त्वाच्या व्यक्तींशी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांचा संवाद सतीश आळेकर यांच्यामुळेच घडू शकला.