"दत्तात्रेय" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
{{हा लेख|भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी श्रीदत्तात्रेय |दत्त (निःसंदिग्धीकरण)}}
'''दत्त (दत्तात्रेय)''' हा [[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] एक [[देव]] व [[योग|योगी]] आहे. स्वधर्म आणि स्वसंस्कृती संकटग्रस्त असताना त्यांची जोपासना व संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य दत्त संप्रदायाने केले. दत्त ही देवता [[अत्रि]] ऋषी व त्यांची पत्नी [[अनसूया]] यांचा पुत्र असून त्याला [[दुर्वास]] व [[सोम]] नावाचे दोन भाऊ आहेत<ref>{{स्रोत पुस्तक | शीर्षक = 'भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश'- (खंड १) | संपादक = [[सिद्धेश्वरशास्त्री चित्राव|डॉ. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव]] | प्रकाशक = [[भारतीय चरित्रकोश मंडळ, पुणे]] | आवृत्ती = [[इ.स. १९६८]] | भाषा = मराठी }}</ref>. हिंदू पौराणिक साहित्यानुसार दत्त, सोम व दुर्वास हे तिघे भाऊ [[विष्णु]], [[ब्रह्मा]] व [[शिव]] यांचे अवतार मानले जातात. पूर्वकाळात विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या दत्ताचे स्वरूप उत्तरकाळात ब्रह्मा, विष्णु व महेश या तिन्ही देवांचे अंशरूप सामावून घेत ''त्रिमुखी'' रूपात उत्क्रमत गेले<ref>{{स्रोत पुस्तक | शीर्षक = 'दत्त संप्रदायाचा इतिहास' | लेखक = [[रा.चिं. ढेरे]] | प्रकाशक = [[पद्मगंधा प्रकाशन, पुणे]] | आवृत्ती = [[इ.स. १९९९]] | आयएसबीएन = ८१-८६१७७-११९-११९ | भाषा = मराठी }}</ref>. दत्तात्रेय ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे, अशी मान्यता आहे.
==स्वरूप==
दत्तात्रेय ही तीन डोकी असलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर अथवा अग्नि समोर बसलेली दिसते. गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चार कुत्री, मागे गाय असा परिसर दिसून येतो. यांची दाढी वाढलेली आणि स्वरूप दिगंबर म्हणजे नग्न अवस्थेत ध्यानस्थ बसलेले दिसते. चार कुत्री हे [[वेद]] आणि शंकराचे [[भैरव]] मानले जातात. [[रुद्राक्ष]], अंगावर भस्म यांवरून तो तंत्रातील स्मशानात
==इतिहास==
सुमारे पाचव्या शतकापासून पुढे दत्तात्रेय पुराण
दत्ताचा उल्लेख
==संप्रदाय==
एक महान [[योगी]] म्हणून दत्तात्रेयास [[नाथ संप्रदाय|नाथ]], [[महानुभाव पंथ]], [[लीळाचरित्र]],[[दत्त संप्रदाय]], तांत्रिक इत्यादी संप्रदायांतील साधक [[उपास्यदैवत]] मानतात.
नाथ संप्रदायात 'राऊळ' अथवा रावळ या नावाने एक उपपंथ आहे. पंथाचे प्रवर्तक नागनाथ हे सिद्धपुरुष
===समावेशकता===
[[गोरक्षनाथ|गोरक्षनाथाने]] अकराव्या शतकात अनेक शैव, शाक्त, वैदिक, अवैदिक धर्मपंथांना एकत्र केले व नाथपंथाची स्थापना केली. दत्तात्रेय [[वारकरी संप्रदाय|वारकऱ्यांनाही]] पूज्य आहे. श्री [[ज्ञानदेव]] आणि श्री [[एकनाथ]] हे श्रेष्ठ दत्तोपासक होते. आनंद संप्रदाय गुरुपरंपरा दत्तात्रेयादी आहेत. चैतन्य संप्रदाय राघव-चैतन्य-केशव-बाबाजी- [[तुकाराम]] अशी गरुपरंपरा आहे. या परंपरेतील राघव चैतन्यांनी दत्ताची उपासना केली होती. मुस्लिमांत या देवतेचा निर्देश शहा फकीर म्हणून होतो. भक्तांसाठी दत्तप्रभू मलंग वेश धारण करतात, अशी धारणा आहे. यामुळे दत्ताचे अनेक मुस्लिम भक्त असतात.
====आखाडे====
[[दशनामी नागा संप्रदाय|दशनामी नागा]] साधूंचे सहा मुख्य आखाडे हे शैवपंथाचे आखाडे आहेत. हे आखाडे सर्वात जुने समजले जातात. त्यातील जुना आखाडा म्हणून ओळखला जाणारा एक आखाडा हा [[भैरव आखाडा]] म्हणूनही ओळखला जातो. या
===उपासनेची वैशिष्ट्ये===
दत्तात्रेयाची उपासना दत्ताला मुख्यत्वे गुरू मानून केली जाते. सगुण प्रतीके उपलब्ध
==दत्ताची तीर्थक्षेत्रे==
दत्तसंप्रदायाचा प्रभाव महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळतो.
* [[गिरनार]] हे दत्तक्षेत्र दत्तात्रेय आणि नाथ संप्रदाय
* नेपाळच्या भटगाव अथवा भक्तपूर इथेसुद्धा दत्तात्रेयाचे मंदिर आणि उपासना आढळते.
* श्रीचांगदेव राऊळ [[माहूर]]च्या यात्रेनिमित्त [[फलटण]]हून निघाले होते. तसेच ते [[द्वारका]] येथे असताना बावन्न पुरुषांना त्यांनी विद्यादान केले असा लिखित उल्लेख आहे. या गोष्टीवरून माहूरच्या दत्तस्थानाचा महिमा अकराव्या शतकापूर्वी दूरवर पसरलेला होता हे सिद्ध होते.
* नृसिंहसरस्वती यांनी आपले वास्तव्य करून तपाचरण तीर्थाटनात समावेश केल्याने [[गाणगापूर]] आणि [[नरसोबाची वाडी]] ही क्षेत्रे दत्त संप्रदायाकरिता श्रद्धेची बनली आहेत. ते औदुंबर
* [[नृसिंहवाडी]] - [[वासुदेवानंद सरस्वती]] उर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केलं आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले आहे. [[विजापूर]]च्या आदिलशाहने आपल्या मुलीचे आंधळेपण जावे म्हणून येथे दत्ताची प्रार्थना केली होती. त्या मुलीला दृष्टी आल्यामुळे [[आदिलशहा]]ने या मंदिराचे बांधकाम करून दिले असा एक
* [[अक्कलकोट]] - दत्त अवतार श्री स्वामी समर्थ महाराज १८५७ मध्ये अक्कलकोट येथे वास्तव्यास आले
* [[गरुडेश्वर]] - योगी श्री [[वासुदेवानंद सरस्वती]] अर्थात [[टेंबेस्वामी]]
===इतर मंदिरे व स्थाने===
* [[विजापूर]]-विजापूरला आपल्याला इब्राहिम आदिलशाहनी बांधलेले दत्तमंदिर आहे.
* कडगंची सायंदेव दत्तक्षेत्र - [[कर्नाटक]] राज्यात [[गुलबर्गा]] शहरापासून २१ कि.मी. वर गुलबर्गा-आळंद रस्त्यावर असलेले हे दत्तक्षेत्र सायंदेवाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीसरस्वती गंगाधर यांनी [[श्रीगुरुचरित्र]] हा ग्रंथ येथे लिहिला. कडगंची इथे असलेली श्रीगुरुचरित्राची मूळ प्रत आहे.
* [[कोल्हापूर]] - दत्तात्रेयांचे अंशावतार मानले गेलेले [[कुंभारस्वामी]] यांनी हे स्थळ आपल्या अवतार कार्यासाठी निवडले होते. स्वामींचा निवास असलेल्या कुंभार गल्लीमध्ये हे दत्तमंदिर आहे. भिक्षा-लिंग-स्थान या नावाचे अजून एक दत्तमंदिर कोल्हापुरात आहे.
* माणिकनगर - बीदर येथील [[हुमणाबाद]] या तालुक्याच्या ठिकाणापासून एक कि.मी.वर असलेले हे क्षेत्र दत्तभक्तांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. [[श्रीमाणिकप्रभू]] यांच्या
* चौल - चौलपासून जवळच असलेल्या एका टेकडीवर दत्तस्थान आहे. याचे मूळ नाव चंपावतीनगर होते. आज हे गाव म्हणजेच चेऊल अथवा चौल नावाने ओळखले जाते. हे महाराष्ट्रात कोकणामध्ये [[रेवदंडा|रेवदंडय़ापासून]] ५ कि.मी.वर आहे. चौल हे या अष्टागरांचे राजधानीचे ठिकाण होते. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला येथे यात्रा भरते.
* अष्टे
* [[खामगाव]] - [[बुलढाणा]] जिल्ह्यातील खामगाव हे दत्त स्थान आहे. येथे [[संत पाचलेगावकर महाराज|संत पाचलेगावकर महाराजांचा]] मुक्तेश्वर आश्रम आहे. निर्गुण पादुका, टेंबेस्वामींनी दिलेली दत्तमूर्ती यामुळे हे स्थान जागृत मानले जाते. मार्गशीर्ष वद्य द्वादशीला येथे उत्सव असतो.
* [[अंबेजोगाई]] - आद्यकवी [[मुकुंदराज]] आणि [[संत दासोपंत]] यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे स्थान आहे. दासोपंती पंथाचे हे स्थान आहे. याचे
* सांखळी ([[गोवा]]) - [[डिचोली]] तालुक्यात सांखळी हे गाव आहे. येथे हे मंदिर आहे. या ठिकाणाला क्षेत्र दत्तवाडी म्हणून ओळखतात. या ठिकाणी [[रामनवमी]], अक्षय्य तृतीया, नवरात्रोत्सव, महाशिवरात्री आणि [[दत्तजयंती]] असे उत्सव साजरे होतात. लक्ष्मण कामत या दत्त भक्ताने या मंदिराची स्थापना केली.
* [[नारेश्वर]] - हे [[गुजरात]] राज्यात आहे. [[रंगावधूत महाराज]] यांच्या वास्तव्याने पावन क्षेत्र आहे. रंगावधूत स्वामींनी खास स्त्रियांसाठी '[[दत्त बावनी]]' हा ग्रंथ लिहिला. श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी हे त्यांचे गुरू. गुजरातमधील [[वडोदरा]] या पासून सुमारे ६० कि.मी.वर हे स्थान आहे. [[नर्मदा परिक्रमा]] करताना हे स्थान लागते. या ठिकाणी दत्त जयंती आणि [[गोकुळाष्टमी]] हे उत्सव साजरे होतात.
== शिष्य व कार्य==
[[श्रीपाद वल्लभ]] व त्यांचे शिष्य [[नृसिंह सरस्वती]] हे इ. स. १३७८ साली जन्मले. या दोघांनी
===संप्रदायाचे ग्रंथ===
* श्री दत्तगुरूंनी 'दत्त संहिता' नावाचा ग्रंथ लिहिला.
* परशुरामांनी त्यावर आधारित 'परशुराम कल्पसूत्र' नावाची पन्नास खंडांची रचना केली.
* सुमेधाने या दोन ग्रंथांच्या आधाराने त्रिपुररहस्य नावाचा ग्रंथ रचला.
* अवधूतगीता नावाचा ग्रंथ एक प्रमाणग्रंथ म्हणून प्रतिष्ठा पावला आहे.
* अथर्ववेदात दत्तात्रेय उपनिषदाचा समावेश आहे.
* [[गोरक्षनाथ]] लिखित हिंदी रचनांचे संकलन [[गोरखबानी]] या ग्रंथात झाले आहे.
* [[मुकुंदराज]] या आद्य [[मराठी]] कवीचे नाथपरंपरेशी जोडणारे उल्लेख आढळतात.
* महानुभावांच्या आद्य ग्रंथापैकी 'साती ग्रंथ' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सात ग्रंथातील 'उद्धवगीता' या भास्करभट बोरीकर नावाच्या एकादशटीकेत प्रारंभीच दत्तात्रेयाला नमन केलेले आहे.
* दत्तमहिमा गाण्यासाठी लिहिलेला सैदाद्रवर्णन हा ग्रंथ आहे.
* गुरुगीता
* दत्तप्रबोध हा ग्रंथ कावडीबुवा यांनी लिहिला.
दासबोधाच्या रचनेसाठी [[रामदास स्वामी]] यांनी दत्तप्रणीत अवधूतगीतेचा आणि गुरुगीतेचा उपयोग केला होता असे दिसून येते.
==संबंधित ग्रंथ==
* [[श्रीगुरुचरित्र]] लेखक सरस्वती गंगाधर
Line ४८ ⟶ ७३:
* दक्षिणामूर्ती संहिता
* दत्तसंहिता
==आधुनिक पुस्तके==
* दत्त संप्रदायाचा इतिहास - लेखक
* श्रीदत्तात्रेय ज्ञानकोश - संपादक डॉ. [[प्र.न. जोशी]]
* 'मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास : तंत्र, योग आणि भक्ती' - लेखक डॉ. सुधाकर देशमुख, पद्मगंधा प्रकाशन
==गीते==
[[आर. एन. पराडकर]] या
===पराडकर यांची सुप्रसिद्ध गीते===
* अनुसूयेच्या धामी आले (कवी सुधांशु)
* दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.▼
* दत्त दिगंबर दैवत माझे.▼
* कृष्णाकाठी दत्तगुरुंचा नित्य असे संचार
* दत्ता दिगंबरा या हो.▼
* गगनिचे नंदादीप जळती (कवी डॉ. व्ही.टी. पंचभाई)
* धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू रायाची.▼
* गुरूदत्त पाहिले कृष्णातिरीं
▲* आज मी दत्तगुरू पाहिले.
* गेलो दत्तमयी हौउनी
* जय जय दत्तराज माऊली
* माझी देवपूजा पाय तुझे.▼
* दत्तगुरू सुखधाम, माझा दत्तगुरू सुख धाम
▲* दत्तगुरूंना स्मरा.
* पुजा हो दत्तगुरू दिनरात.▼
* दत्तराज पाहुनी आज तुष्टलो मनी
▲* दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. (कवी सुधांशु; राग यमन)
* निघालो घेऊन दत्ताची पालखी
* मज भेटुनी जा हो दत्तसख्या अवधूता
वगैरे.
.
== संदर्भ ==
|